लोकसभा निवडणूक 2024

महायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...

Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Mar 28, 2024, 02:51 PM IST

ठाकरेंकडून उमेदवारी, ईडी किर्तीकरांच्या दारी...अमोल किर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?

Loksabha 2024 : उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अमोल किर्तीकरांना ईडीने तात्काळ समन्स बजावलं. मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणीत वाढ झालीय. 

Mar 27, 2024, 07:45 PM IST

महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे. 

Mar 27, 2024, 02:54 PM IST

लोकसभेआधी आघाडीत बिघाडी! सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव...काँग्रेसची स्बळाची तयारी?

Loksabha 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव निर्माण झालाय. सांगलीत ठाकरेंविरोधात काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Mar 27, 2024, 02:03 PM IST

Loksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. 

Mar 27, 2024, 09:06 AM IST

Bacchu Kadu: बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यात यश? मुख्यमंत्र्यांची कडू,अडसूळ कुटुंबासोबत चर्चा

Bacchu Kadu : अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अमरावतीतील तिढा सोडवण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mar 27, 2024, 06:51 AM IST

मविआचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं! शिंदे-पवार गटाचे उमेदवार ठरेनात?

Loksabha 2024 : राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. भाजपने 23 तर काँग्रेसने 12 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र शिंदे गट, अजित पवार गट तसंच ठाकरेंचे उमेदवार मात्र काही ठरलेले नाहीत. जागावाटपावरुन सर्वच पक्षांचं घोडं अडलंय. जागावाटपाचा हा कळीचा प्रश्न कधी सुटणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. 

Mar 26, 2024, 07:15 PM IST

आताची मोठी बातमी! मविआचं जागावाटप ठरलं, वंचित सोबत न आल्यास असा आहे फॉर्म्युला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अनेक दिवसांच्या चर्चांनंतर अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. वंचीत सोबत न आल्यास तीनही पक्षांना किती जागा मिळतील यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. 

Mar 26, 2024, 03:21 PM IST

ठरलं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी 'या' तारखेला जाहीर होणार, 'इतक्या' जागांवर ठाम

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. पण आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची यादी जाहीर होणार आहे. 

Mar 25, 2024, 02:13 PM IST

महाराष्ट्रात भाजप - काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार

Loksabha Election: काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. नागपुरात काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

 

Mar 24, 2024, 01:16 PM IST

Loksabha Election: काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?

Loksabha Election: काँग्रेसने लोकसभेसाठी 46 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. वाराणसीतूनही आपला उमेदवार जाहिर केला आहे. काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. 

Mar 24, 2024, 07:30 AM IST

नणंद भावजयाच्या प्रचाराचा धुरळा! आज इंदापूरमध्ये राजकीय महाकुंभ; कार्यकर्त्यांची मात्र भलतीच गोची

Loksabha Election 2024 : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक बारामती असून यातील राजकीय रंगत आता वाढताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. 

 

Mar 23, 2024, 08:15 AM IST

मतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा

Loksabha 2024 : शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीसह महाविकास आघाडीतही उमेदवारावरून रस्सीखेच सुरूय. नेमकं काय आहे शिर्डीतील राजकीय चित्र. पाहूयात हा रिपोर्ट...

Mar 22, 2024, 08:40 PM IST

मोदींची औरंगजेबाशी तुलना... संजय राऊतांविरोधात भाजपाचा मोठा निर्णय

Loksabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने संजय राऊत यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 22, 2024, 06:51 PM IST

शरद पवार लोकसभा लढणार? 'या' 9 मतदारसंघांवर पवार गटाचं शिक्तामोर्तब; वाचा संपूर्ण यादी

LokSabha 2024: शरद पवार गटाला महाविकास आघाडीत 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांची यादी समोर आली आहे. दरम्यान शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात अशी चर्चा आहे. 

 

Mar 22, 2024, 05:55 PM IST