What is sleep talking? : मेंदु हा आपल्या शरिरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मेंदू आपल्या शरीराला कार्य करण्यास मदत करतो. उदाहरण संवाद साधणं, कोणत्या ही गोष्टीवर रिअॅक्ट करण्यापासून उठण्या-बसण्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी संकेत देतो की आपण आता हे करायला हवं. आपण कोणतीही क्रिया करताना अनेकदा आपण विचार करतो तर अनेकदा काही गोष्टी पुढच्या सेकंदाला घडतात तर हे कशामुळे तर हे मेंदू जे आपल्याला संकेत देतात त्यावरून होतं. आता तुम्ही झोपेतानाच बघा, आपण झोपलेलो असतो तेव्हा आपला मेंदूही झोपतो असं अनेकांना वाटतं मात्र, हे सत्य नाही. मेंदूचा काही भाग हा सतत काहीतरी क्रिया करत असतो. रात्री आपल्याला अनेकदा स्वप्न येतात. काही लोक डोळे उघडे ठेवून झोपतात, काही लोक झोपेत बोलतात आणि काही लोक तर चक्क झोपेत प्रश्नांची उत्तरे देतात आता हे नक्की कशामुळे होत असेल? हे आज आपण जाणून घेऊया...
2017 च्या sleep.com च्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की 66% लोक हे झोपेत बोलतात आणि लहान मुलांमध्ये ही टक्केवारी 50% आहे. लहान मुलांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. तुम्हाला असलेला हा त्रास आधी तुमच्या घरच्यांनाचं समजून येतं. उदाहरणार्थ, झोपेत हसणं, तोंडातल्या तोंडात पुटपुटणं, ओरडणं, झोपेत लोकांची अभिव्यक्ती बदलणे ही झोपेत बोलण्याची लक्षणं आहेत. यात सामान्य दोन शब्द वापरले जातात ते म्हणजे ‘हो' किंवा 'नाही'
हेही वाचा : सहावीतल्या मुलानं जिंकले 12 लाख 50 हजार; बिस्किटबद्दलच्या प्रश्नावर डाव सोडल! तुम्हाला माहितीये का उत्तर?
झोपेत बोलणं हे अति विचार, ताण-तणाव किंवा आणखी काही मानसिक त्रासामुळे होऊ शकतं. हे धोकादायी सुद्धा असू शकतं कारण तुम्ही झोपेत तुमच्या बाजूच्याला लाथ, बुक्का किंवा काहीही करु शकतात किती तरी लोक झोपेत चालूही लागतात. झोपेत बोलण्याच्या सवयीमुळे किती तरी लोकांना लाज वाटू लागते कारण चुकून कधी कोणत्या व्यक्तीबद्दल वाईट बोलले आणि त्या व्यक्तीनं ऐकलं तर ते किती लाजिरवाणं होईल असं त्यांना सतत वाटत असतं. हा त्रास अनुवांशिक सुद्धा असू शकतो. झोपेत बोलण्याची ही घटना मानसिक आजाराशी संबंध असल्याचे अनेक लोक म्हणतात पण ते तसं नाही.
( Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. )