लोकसभा निवडणूक 2014

भाजप नेते गिरीराज सिंह यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

भाजप नेते गिरीराज सिंह यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशामध्ये अनेक लोक मोदींना रोखण्याचा प्रयत्न करत असून अशा व्यक्तींचा राजकीय मक्का-मदिना पाकिस्तानात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

May 14, 2014, 12:12 PM IST

यंदाची निवडणूक सर्वात महागडी, ३३४२६ कोटी खर्च!

लोकसभा निवडणूक म्हणजे कोट्यवधींची उधळण हे पुन्हा दिसून आलंय. यंदाची निवडणूक तर सर्वांत महागडी ठरली आहे. निवडणुकीसाठी सरकारनं ३४२६ कोटी रुपये खर्च केले, तर विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून ३० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळं एकत्रित ३३,४२६ कोटी रुपयांचा चुराडा या निवडणुकीत झाला आहे.

May 14, 2014, 10:07 AM IST

मोदींची पाकिस्तानला धडकी, केवळ मोदींचीच चर्चा

16 मेला साऱ्या जगाची नजर भारताकडे लागलेली असेल. आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तानची तर आत्ताच पायाखालची वाळूच सरकलीय. सध्या नरेंद्र मोदींची चर्चा पाकिस्तानमध्ये चांगलीच रंगलीय. पाकिस्तानी मीडियात तर केवळ नरेंद्र मोदीच झळकत आहेत. एवढंच नव्हे तर दहशतवादी हाफिज सईद याचेदेखील चांगलेच धाबे दणाणलेत.

May 13, 2014, 03:46 PM IST

भारतीय नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक - ओबामा

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही नव्या सरकारचे वेध लागले आहेत. भारताच्या नव्या लोकनियुक्त सरकारसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं ओबामांनी म्हटलयं.

May 13, 2014, 02:49 PM IST

एका जागेसाठी मोदींनी केला एका तासाचा हवाई प्रवास

लोकसभा निवडणूक 2014 च्या अंतिम टप्प्यातील मतदारसंघात मतदान होतंय. पण, गेल्या जवळजवळ दीड महिन्यांच्या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मॅरोथॉन रॅलींवर नजर टाकली तर लक्षात येईल की मोदी जमिनीपेक्षा जास्त काळ ‘हवेत’च होते.

May 12, 2014, 10:16 AM IST

राहुल गांधींचा रोड शो, विरोधकांची टीका!

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर आज राहुल गांधी वाराणसीत भव्य रोड शो केला. काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज शेवटच्या दिवशी वाराणसीत आले आहेत आणि याठिकाणी ते शक्तिप्रदर्शन करतायत. राहुल गांधींच्या आजच्या रोड शो आणि सभेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय.

May 10, 2014, 02:42 PM IST

लोकसभा निवडणूक 2014 : देशातील राजकीय पक्ष

अखिल भारतीय शिवसेना राष्ट्रवादी पार्टी… अशा नावाचा राजकीय पक्षाचं तुम्ही कधी नावही ऐकल्याचं तुम्हाला आठवतंय का? कदाचित नसेलही... तुम्ही, हा काय वात्रटपणा आहे... शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र? शक्यच नाही... पण, भारतातीय राजकारणात अशक्य असं काहीच नाही, असं म्हटलं तरी हरकत नाही.

May 7, 2014, 02:23 PM IST

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपा-राज ठाकरे मैत्री कळीचा मुद्दा!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर मुंबई आणि इतर ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवारही उभे केले नाहीत.

Apr 27, 2014, 03:32 PM IST

उत्तर प्रदेशात आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला!

उत्तर प्रदेशात यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे अनेकांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. इथल्या आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा यंदा पणाला लागलीय. १७ आणि २४ एप्रिलला होणार्‍या पाचव्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानात दिग्गज राजकारण्यांचा फैसला होणार आहे.

Apr 17, 2014, 04:15 PM IST

एकाच कुटुंबातील 301 सदस्यांनी केलं मतदान

आसामच्या तेजपूर मतदार क्षेत्रातील सुदूर गावामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील 301 सदस्यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. हे सर्व मतदार एकाच कुटुंबातले असून एकाच गावातही राहतात. त्यांचे पुर्वज नेपाळहून येवून इथं स्थायिक झाले होते.

Apr 10, 2014, 08:10 PM IST

मतांचं विभाजन करण्यासाठीची अशी ही खेळी!

नावात काय आहे असं नेहमी म्हटलं जातं, पण निवडणुकीच्या रिंगणात नावाला बरंच महत्त्व असतं. एक सारखं नाव आणि आडनावाची उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर बलाढ्य उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. मावळ लोकसभा मतदार संघात एकाच नावानं असेच उमेदवार उभे राहिलेत. आता ते कोणी उभे केले? का केले? हे गुलदस्त्यात असलं तरी त्याचा फटका तुल्यबळ उमेदवाराला बसण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.

Mar 27, 2014, 09:11 PM IST

सोशल मीडियावर पॉलिटिकल वॉर

सोशल मीडियावर सध्या पॉलिटिकल वॉर सुरू झालंय... तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया साइट्सवर जोरदार फिल्डिंग लावलीय...

Mar 26, 2014, 10:15 PM IST

निम्हण रुसले,कोपऱ्यात बसले, सीएम गेले पुसायला!

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सध्या स्वपक्षीय आमदाराची मनधरणी करण्याची पाळी आलीय. पुण्यातले काँग्रेसचे नाराज आमदार विनायक निम्हण यांची समजूत काढण्यासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली.

Mar 26, 2014, 06:39 PM IST

काँग्रेसचा का हाथ, खास आदमी के साथ

काँग्रेसचे `दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे` असावेत... भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची भाषा एकीकडे उपाध्यक्ष राहुल गांधी करतायत. तर दुसरीकडे आदर्श घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने नांदेडमधून उमेदवारी दिलीय.

Mar 26, 2014, 06:17 PM IST

कोकणात शिवसेना नेत्यांचा राजकीय शिमगा

होळीचा सण संपला तरी कोकणातल्या शिवसेना नेत्यांमधला राजकीय शिमगा अजून सुरूच आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अनंत गिते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यातील धुसफूस अजून संपलेली नाही. उलट त्यांच्यातील संघर्ष आणखीच धुमसतोय.

Mar 26, 2014, 04:33 PM IST