कोकणात शिवसेना नेत्यांचा राजकीय शिमगा

होळीचा सण संपला तरी कोकणातल्या शिवसेना नेत्यांमधला राजकीय शिमगा अजून सुरूच आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अनंत गिते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यातील धुसफूस अजून संपलेली नाही. उलट त्यांच्यातील संघर्ष आणखीच धुमसतोय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 26, 2014, 08:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
होळीचा सण संपला तरी कोकणातल्या शिवसेना नेत्यांमधला राजकीय शिमगा अजून सुरूच आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अनंत गिते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यातील धुसफूस अजून संपलेली नाही. उलट त्यांच्यातील संघर्ष आणखीच धुमसतोय.
रामदास कदमांवर रायगडची कसलीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही, असं लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार अनंत गिते यांनी सांगितलंय. तर उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांना प्रचारापासून दूर ठेवण्यासंदर्भात कुठलेही आदेश दिले नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलंय. रामदास कदम हे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारास जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
"मी अनंत गीतेंचा प्रचार करणार नाही, कारण त्यांनी माझा प्रचार केला नव्हता", असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्यानंतर या गीते आणि कदम यांच्यातला हा वाद चव्हाट्यावर आला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ