निम्हण रुसले,कोपऱ्यात बसले, सीएम गेले पुसायला!

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सध्या स्वपक्षीय आमदाराची मनधरणी करण्याची पाळी आलीय. पुण्यातले काँग्रेसचे नाराज आमदार विनायक निम्हण यांची समजूत काढण्यासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 26, 2014, 06:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सध्या स्वपक्षीय आमदाराची मनधरणी करण्याची पाळी आलीय. पुण्यातले काँग्रेसचे नाराज आमदार विनायक निम्हण यांची समजूत काढण्यासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली.
विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून निम्हण रूसून बसलेत. काँग्रेसच्या तसंच आघाडीच्या कुठल्याच कार्यक्रमात ते सहभागी झाले नाहीत. सुमारे अर्धा तास चाललेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी निम्हण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या आणि सर्व पक्षांमध्ये तिकीट न मिळालेल्यानं आयाराम, गयाराम सुरू झालं. अशातच मुख्यमंत्र्यांना निम्हण यांची मनधरणी करायला जावं लागणं म्हणजे...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.