www.24taas.com, वृत्तसंस्था, पाटना
भाजप नेते गिरीराज सिंह यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशामध्ये अनेक लोक मोदींना रोखण्याचा प्रयत्न करत असून अशा व्यक्तींचा राजकीय मक्का-मदिना पाकिस्तानात असल्याचं त्यांनी म्हटलंय. असे लोक पाकिस्तान आणि दहशतवाद पसरवतात आणि त्यांची जागा पाकिस्तानात असली पाहिजे. सर्व दहशतवादी हे एकाच धर्माचे कसे, असंही नंतर ते म्हणाले.
नंतर मात्र गिरीराज सिंह यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं ते म्हणाले. मी कोणत्याही व्यक्तीसाठी नाही तर दहशतवादी संघटनांबद्दल बोललो.
भाजपचे नवादा मतदारसंघाचे उमेदवार गिरीराज सिंह यांनी मंगळवारी भाजप कार्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत म्हटलं की, "जनतेला जर काश्मीरमधून 370 कलम दूर सारावी हे हवं असेल. काश्मीरमध्ये 370 कलम असल्यामुळं संपूर्ण विकास होऊ शकला नाही. काश्मीरला विकसित राज्य बनवण्यासाठी 370 लागू करण्यात आलं होतं, मात्र हा उद्देश अद्याप पूर्ण झाला नाही."
भाजप नेते गिरीराज सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता राजकीय पडसाद उमटू लागलेत. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनं सडकून टीका केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.