एका जागेसाठी मोदींनी केला एका तासाचा हवाई प्रवास

लोकसभा निवडणूक 2014 च्या अंतिम टप्प्यातील मतदारसंघात मतदान होतंय. पण, गेल्या जवळजवळ दीड महिन्यांच्या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मॅरोथॉन रॅलींवर नजर टाकली तर लक्षात येईल की मोदी जमिनीपेक्षा जास्त काळ ‘हवेत’च होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 12, 2014, 10:16 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
लोकसभा निवडणूक 2014 च्या अंतिम टप्प्यातील मतदारसंघात मतदान होतंय. पण, गेल्या जवळजवळ दीड महिन्यांच्या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मॅरोथॉन रॅलींवर नजर टाकली तर लक्षात येईल की मोदी जमिनीपेक्षा जास्त काळ ‘हवेत’च होते.
272 चा आकडा गाठण्यासाठी जवळजवळ तेवढ्याच तासांचा हवाई प्रवास मोदींनी गेल्या 45 दिवसांमध्ये केल्याचं समजंतय. म्हणजेच जवळजवळ एका जागेसाठी मोदींनी एका तासाचा हवाई प्रवास केला, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.
दीड महिन्यांत मोदींनी जवळपास दोन लाख किलोमीटरचा हवाई प्रवास करून 25 राज्यांमध्ये 196 रॅली घेतल्यात. मोदींनी हा सगळा प्रवास अदानी आणि टाटा या खाजगी कंपन्यांच्या चार्टार विमानांतून केलाय. या चार्टर विमानांच्या इंजिनांची गती 600 ते 800 किलोमीटर प्रति तास आहे. मोदींनी प्रती दिन जवळपास चार हजार किलोमीटरचा हवाई प्रवास केलाय.
जिथं चार्टर विमान उतरवण्याची सोय नव्हती तिथं मोदी हॅलिकॉप्टरनं रॅलीच्या ठिकाणी दाखल झाले होते. हॅलिकॉफ्टरची गती 150 ते 200 किलोमीटर प्रती तास असते. गेल्या 45 दिवसांच्या मोदींच्या प्रवासाचं आकलनं केलं तर दररोज सहा तासांत सुमारे 700 किलोमीटर प्रति तासानं त्यांनी हवाई प्रवास केला. म्हणजेच नरेंद्र मोदी सुमारे 270 तास ‘हवेत’च होते. म्हणजे, त्यांनी जवळपास 11 दिवस आणि रात्री इतका प्रवास आकाशात केलाय.
13 सप्टेंबर 2013 रोजी भाजपनं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचं नाव घोषित केलं आणि त्याच्या दोनच दिवसानंतर 15 सप्टेंबर रोजी रेवाडीमध्ये त्यांनी माजी सैनिकांची एक मोठी रॅली घेतली. तेव्हापासून निवडणुकीची रणधुमाळी करेपर्यंत मोदींनी रॅली घेण्यासहीत विमान प्रवासाचाही धडाका लावला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.