दीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केसरकरांचा राजीनामा मागितल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळं केसरकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
Apr 13, 2014, 01:40 PM ISTविकासाचं सोंग आणून आघाडीचे मंत्री लाटतात जमिनी
काँग्रेस आघाडीतले मंत्री हे नुसतेच गब्बर नाहीत, तर योजनाबद्धरित्या यांनी महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या जमिनी मोठ्या प्रमाणावर लाटल्या आहेत. त्या जमिनी लाटताना योजना आखून पद्धतशीरपणे लाटल्या आहेत. आधी स्वतःसाठी जमिनी शोधतात त्या विकत घेतात आणि नंतर सरकारी तिजोरीतून त्या जागेवर प्रकल्प मंजूर करून विकासाचा सोंग आणतात, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी महाड इथल्या सभेत केली आहे.
Apr 13, 2014, 12:26 PM ISTअबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब
अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 10, 2014, 07:33 PM ISTसुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काहीच केलं नाही- मोदी
वडोदऱ्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दाखल झाले. सांगलीत त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी `सांगली बनवूया चांगली`चा नारा दिला. त्यानंतर घराणेशाहीवर सडकून टीका करत घराणेशाही विकासाला खीळ बसवत असल्याचं म्हटलंय.
Apr 9, 2014, 06:48 PM ISTरायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे, घड्याळ विरुद्ध घड्याळ!
रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे अशी एक रंगतदार लढत रंगणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून सुनील शाम तटकरे या नावाच्या व्यक्तीनंही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे इथं एक वेगळीच रंगत निर्माण केलीय.
Apr 9, 2014, 03:44 PM IST`राजीनामे देऊ पण राणेंचा प्रचार करणार नाही`
सिंधुदुर्गात काँग्रेस-राष्ट्रवादी वाद चिघळल्याचं दिसतंय. राणेंच्या प्रचारासाठी वरिष्ठांकडून येत असलेला दबाव धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले राजीनामेच सादर केलेत.
Apr 9, 2014, 01:45 PM ISTराष्ट्रवादीचा असाही फंडा, सभेत प्रमुख वक्ता येईपर्यंत ऑर्केस्ट्रा
प्रचारसभेत मुख्य वक्ता येईपर्यंत गर्दीला खिळवून ठेवण्याची कसरत स्थानिक नेत्यांना करावी लागते. ही गर्दी कायम ठेवण्याची युक्ती पिंपरी चिंचव़डच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शोधलीय. स्थानिक नेत्यांची रटाळ भाषणं ऐकवण्यापेक्षा श्रोत्यांचं मनोरंजन करण्याचा फंडा राष्ट्रवादीनं सुरु केलाय.
Apr 6, 2014, 09:52 PM ISTपराभव समोर दिसत असल्यानं पवारांचा तोल सुटला- गडकरी
शरद पवारांनी काल जाहीर सभेमध्ये मोदींना ट्रीटमेंटची गरज असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर आज भाजप नेते नितीन गडकरींनी टीका केलीय. मोदींवर पवारांनी केलेलं वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे. पवारांना पराभव समोर दिसत असल्यानं त्यांचा तोल सुटल्याचं गडकरींनी म्हटलंय.
Mar 31, 2014, 12:55 PM ISTमोदींच्या डोक्यावर परिणाम झाला - शरद पवार
काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या डोक्यावर परिणाम झालाय. आमची सत्ता आली की त्यांचा योग्य उपचार करू अशा शब्दात मोदींवर शरद पवारांनी टीका केली. ते जालना इथं बोलत होते.
Mar 31, 2014, 11:52 AM ISTशिवसेना पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज -शरद पवार
ज्या पक्षाचे खासदार पक्ष सोडू जातात त्या पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलीय. डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपेंच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलाय.
Mar 27, 2014, 07:16 PM ISTवक्तव्याबद्दल खेद, विषय इथंच संपवा - शरद पवार
दोनदा मतदान करा, या वादग्रस्त विधानाप्रकरणी शरद पवारांनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलंय. माझ्या वक्तव्याबद्दल झालेल्या गोंधळामुळे मी खेद व्यक्त करतोय. तसंच हा विषय इथेच संपवावा, अशी विनंती शरद पवारांनी केलीय.
Mar 26, 2014, 07:22 PM ISTदोन-दोनदा करा मतदान, मोहितेंचा मतदारांना सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी मुंबईत एका प्रचार कार्यक्रमात मुक्ताफळं उधळलीत.
Mar 21, 2014, 08:53 AM ISTबदलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार
बदलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष योगेश राऊत यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यामुळे बदलापूरमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, या गोळीबाराचा निषेध म्हणून मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
Mar 18, 2014, 05:33 PM ISTराष्ट्रवादीच्या कपिल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश!
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामचा सिलसिला सुरूच आहे. राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देत भाजपनं भिवंडीचे शहरप्रमुख आणि ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय.
Mar 18, 2014, 04:10 PM ISTगावित पिता-पुत्री भाजपमध्ये प्रवेश करणार?
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजतंय.
Mar 18, 2014, 12:39 PM IST