राष्ट्रवादीचा असाही फंडा, सभेत प्रमुख वक्ता येईपर्यंत ऑर्केस्ट्रा

प्रचारसभेत मुख्य वक्ता येईपर्यंत गर्दीला खिळवून ठेवण्याची कसरत स्थानिक नेत्यांना करावी लागते. ही गर्दी कायम ठेवण्याची युक्ती पिंपरी चिंचव़डच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शोधलीय. स्थानिक नेत्यांची रटाळ भाषणं ऐकवण्यापेक्षा श्रोत्यांचं मनोरंजन करण्याचा फंडा राष्ट्रवादीनं सुरु केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 6, 2014, 09:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी
प्रचारसभेत मुख्य वक्ता येईपर्यंत गर्दीला खिळवून ठेवण्याची कसरत स्थानिक नेत्यांना करावी लागते. ही गर्दी कायम ठेवण्याची युक्ती पिंपरी चिंचव़डच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शोधलीय. स्थानिक नेत्यांची रटाळ भाषणं ऐकवण्यापेक्षा श्रोत्यांचं मनोरंजन करण्याचा फंडा राष्ट्रवादीनं सुरु केलाय.
शिरुर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचार सभेत गाण्याचा कार्यक्रम कायम दिसतो. अजित पवारांची सभा असो किंवा आर.आर. पाटील यांची... स्वरविहार संस्थेचे तीन गायक हमखास हजर असतात. देशभक्तीपर तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तयार केलेलं गीत सादर करत ते सभेसाठी जमलेल्या श्रोत्यांना प्रमुख वक्ते येईपर्यंत खिळवून ठेवतात.
अर्थात हे काम स्वयंस्फुर्तीनं करतात असं मानायला कोणी तयार नसंल तरी स्वरविहारचे गायक मात्र शरद पवारांवर असलेल्या प्रेमाखातर ही गाणी सादर करत असल्याचं सांगतात.
ऑर्केस्ट्राच्या या मनोरंजनाचा मतांवर किती परिणाम होतो हे सांगण तसं कठीण आहे. पण किमान सभांना गर्दी करण्यासाठी आणि प्रमुख नेत्यांच्या भाषणापर्यंत गर्दी थांबवण्यासाठी हे तंत्र उपयोगी पडतय हे मात्र खरं...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.