दोन-दोनदा करा मतदान, मोहितेंचा मतदारांना सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी मुंबईत एका प्रचार कार्यक्रमात मुक्ताफळं उधळलीत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 21, 2014, 08:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी मुंबईत एका प्रचार कार्यक्रमात मुक्ताफळं उधळलीत.
१७ तारखेला मावळमध्ये आणि २४ तारखेला मुंबईत मतदान करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना करून टाकलं. बोटावरची शाई कशी पुसायची, हे तुम्हाला ठाऊक आहेच असंही ते म्हणाले.
c
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घाटकोपरमध्ये ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय पाटील यांच्या निर्धार मेळाव्याचं आय़ोजन करण्यात आलं होतं. तिथे खेडचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी ही मुक्ताफळं उधळली.
विशेष म्हणजे त्यावेळी स्टेजवर विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. स्टेजवर त्यांनी केलेल्या विधानांबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांनी ती फक्त गंमत होती, अशी सारवासारव केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.