राष्ट्रवादीच्या कपिल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामचा सिलसिला सुरूच आहे. राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देत भाजपनं भिवंडीचे शहरप्रमुख आणि ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 18, 2014, 04:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भिवंडी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामचा सिलसिला सुरूच आहे. राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देत भाजपनं भिवंडीचे शहरप्रमुख आणि ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय.
कपिल पाटील यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानं भाजपची भिवंडी मतदारसंघातली ताकद वाढल्याचं मानलं जातंय. कपिल पाटील यांनीही मोदींचा लाट असल्याचं सांगत आपल्याला भिवंडीचा विकास करायचा असल्यामुळं भाजपमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलंय.
मात्र कपिल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरलीय. आपल्या नाराजी बद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितल्यानंतरही त्यांनी कपिल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचं भाजपचे भिवंडी प्रदेश कार्यकारणी सदस्य श्यामजी अग्रवाल यांनी म्हटलंय.
दरम्यान, आता कपिल पाटील यांना भाजपकडून भिवंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली जावू शकते असंही बोललं जातंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.