www.24taas.com, झी मीडिया, सांगली/सोलापूर
वडोदऱ्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दाखल झाले. सांगलीत त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी `सांगली बनवूया चांगली`चा नारा दिला. त्यानंतर घराणेशाहीवर सडकून टीका करत घराणेशाही विकासाला खीळ बसवत असल्याचं म्हटलंय.
तसंच काँग्रेसचं घोषणापत्र नसून ते धोकापत्र असल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्य़ांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून द्यायचा असल्यास पाण्याच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पाण्याच्या नियोजनाचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांकडून घ्यावा असंही म्हटलं.
तर सोलापूरमधील जाहीर सभेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.
१०० दिवसांत महागाई दूर करण्याचं आश्वासन काँग्रेसनं पाळलं नाही, याकडं लक्ष वेधतानाच, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या राहुल गांधींना गरीबांचं दुःख काय कळणार, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रातील एलबीटी म्हणजे `लुटो बांटो टॅक्स` असल्याचा हल्ला मोदींनी चढवला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.