‘ज्यांना शिवसेनेत यायचंय, त्यांनी लवकरात लवकर यावं’ - उद्धव
सांगली: ज्यांना शिवसेनेत यायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर यावं, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपुरात दिलाय. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
नुकताच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आपण लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.
Jul 13, 2014, 03:09 PM ISTअखेर केसरकरांचा राष्ट्रवादीला राम-राम, शिवसेनेत करणार प्रवेश!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम केलाय. केसरकरांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचं जाहीर केलंय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून दीपक केसरकरांनी हे जाहीर केलंय.
Jul 13, 2014, 01:57 PM IST144 जागा हव्याच, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं स्पष्ट
विधानसभेच्या जागावाटपावरून काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. विधानसभेसाठी अजित पवारांनी केलेली 144 जागांची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, असं सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी फेटाळली होती.
Jul 9, 2014, 07:33 PM ISTराष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात मोठा धक्का, अजितराव घोरपडे भाजपात
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय़. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि विजयानंतर आता अजित घोरपड्यांच्या भाजप प्रवेशामुळं सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
Jul 7, 2014, 09:33 PM ISTराष्ट्रवादीची ‘टिकटिक’ केवळ महाराष्ट्रातच वाजणार!
राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळाची टिकटिक केवळ राज्यापूरतीच राहू शकते.
Jun 30, 2014, 02:09 PM ISTउद्धव ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा समाचार
पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लवासाचं समर्थन करणारे NCP अध्यक्ष शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांना जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, दुष्काळ दिसत नाही. त्यांना फक्त लवासासारखी आणखी शहरं हवीत, असा हल्ला ठाकरेंनी चढवला.
Jun 25, 2014, 03:30 PM ISTसुनील तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार याचे संकेत आधीच देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष निवडण्यात आले आहेत. सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय.
Jun 25, 2014, 02:29 PM ISTराष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढील आठवड्यात फेरबदल - शरद पवार
राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढच्या आठवड्यात फेरबदल होणार आहेत. एवढंच नव्हे तर संघटना पातळीवरही बदल केले जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच दिलीय.
Jun 20, 2014, 06:38 PM ISTराज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं.
Jun 19, 2014, 10:25 PM ISTपवारांना CM उमेदवार जाहीर केलं तरी फरक नाही - तावडे
शरद पवारांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केलं तरी काहीही फरक पडणार नाही, त्यांचं आव्हान आता उरलेलं नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय. विनोद तावडे यांनी. राष्ट्रवादीनं आधीच भ्रष्टाचाराला आळा घालायला हवा होता, असंही ते म्हणाले.
Jun 7, 2014, 05:49 PM ISTराष्ट्रवादीचंही अब की बार, शरद पवार!
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीही अस्वस्थ आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हतबल झालेत आणि आता थेट शरद पवारांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करा, अशी त्यांची मागणी आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनीही कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिळवलाय.
Jun 7, 2014, 02:47 PM ISTकाँग्रेसचा घोळ संपला, अमित देशमुख- अब्दुल सत्तारांचा शपथविधी
काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळावर अखेर पडदा पडलाय. आज सकाळी साडेनऊ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल के. शंकर नारायणन या दोन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
Jun 2, 2014, 09:13 AM ISTकाँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता.
Jun 1, 2014, 12:56 PM ISTकाँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रीपदांची नावं निश्चितीसाठी मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
Jun 1, 2014, 09:19 AM ISTउद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, आव्हाडांना संधी?
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड व आमदार शरद गावित यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांना डच्चू मिळणार असल्याचं समजतं.
May 28, 2014, 03:35 PM IST