विधानसभेसाठी अर्ध्या जागा द्या... नाहीतर...!

जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचा मान राखावा अन्यथा आणखी एक चांगला मित्र गमावण्याची वेळ काँग्रेसवर येईल असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिलाय. 

Updated: Jul 22, 2014, 08:48 PM IST
विधानसभेसाठी अर्ध्या जागा द्या... नाहीतर...!   title=

मुंबई: जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचा मान राखावा अन्यथा आणखी एक चांगला मित्र गमावण्याची वेळ काँग्रेसवर येईल असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिलाय. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राज्यात दोन जागा अधीक मिळाल्यानं राष्ट्रवादी कमालीची आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीनं विधानसभेसाठी थेट निम्मे जागांची मागणी केली आहे. त्यात युपीएचा घटक पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंही एकला चलोरेची भूमिका घेतल्यानं काँग्रेसचा एक मित्र कमी झालाय. ही संधी साधून राष्ट्रवादीनंही थेट आघाडी तो़डण्याचीच भाषा केल्यामुळं काँग्रेसची चांगलीच अडचण झालीय. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की जर काँग्रेसनं त्यांना 144 जागा दिल्या नाही, तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवेल. 

परिस्थितीचा अंदाज घेवून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसला आपला इंगा दाखवतायेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव म्हणून नृपेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीवरून लोकसभेत ट्राय संशोधन विधेयकाला राष्ट्रवादीच्या पवारांनी समर्थन देऊन सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. शिवाय महागाईच्या मुद्द्यावरही जेव्हा काँग्रेसनं संसदेतून वॉकआऊट केलं तेव्हा राष्ट्रवादी त्यांच्यासोबत नव्हती.  त्यामुळं पवारांच्या मनात नेमकं आहे तरी काय, हे येणारा काळच सांगेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.