नवी दिल्ली: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कायम राहणार आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची नवी दिल्लीत बैठक पार पडलीय त्यात आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पवार आणि सोनियांमध्ये जागावाटपावरही चर्चा झालीय.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभेच्या जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरु आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 174 जागा लढवल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 114 जागा लढवल्या होत्या. यावेळी दोन्ही पक्ष जागा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करताहेत. आता जागावाटपाचं अंतिम सुत्र शरद पवार आणि सोनिया गांधींच्या चर्चेतूनच ठरणार हे स्पष्ट झालयं.
लोकसभेत काँग्रेसला राज्यात अवघ्या 2 तर राष्ट्रवादीला 4 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळण्याचं राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं. अनेक वेळा तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचंही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.