10 वर्ष राष्ट्रवादीनं सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत- मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत इतकी वर्षे सत्ता भोगली तेव्हा त्यांना दोष सापडले नाहीत. मात्र, लोकसभेचे निकाल धक्कादायक लागताच आता प्रत्येकाला शहाणपण सुचू लागलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

Updated: Aug 3, 2014, 04:13 PM IST
10 वर्ष राष्ट्रवादीनं सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत- मुख्यमंत्री title=

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत इतकी वर्षे सत्ता भोगली तेव्हा त्यांना दोष सापडले नाहीत. मात्र, लोकसभेचे निकाल धक्कादायक लागताच आता प्रत्येकाला शहाणपण सुचू लागलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

तसंच त्रिपाठी यांचे वक्तव्य हे केवळ संधीसाधूपणा असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. एका कार्यक्रमानिमित्तानं चव्हाण हे पुण्यात आले होते. त्यामुळं आघाडीत जागा वाटपावरून बिघाडी झाली असताना नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात निम्म्या जागा मिळाव्यात, अशी मागणी करीत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद वाढली असून, काँग्रेसला शहाणपण यावं, असं वक्तव्य त्रिपाठी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत केलं होतं. तसंच काँग्रेसला आघाडी चालविण्याची बुद्धी नसल्याची टीकाही त्यांनी केली होती. या वक्तव्याचा मुख्यमंत्री चव्हाण यांनी शनिवारी खरपूस समाचार घेतला.  महाराष्ट्रातील आणि देशातील जनता सुज्ञ असून ती प्रत्येकाला ओळखते, असं ते म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.