सावकारी विरोधी कायदा लागू, राष्ट्रपतींची मसुद्यावर स्वाक्षरी
गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारनं मंजूर केलेल्या कायद्याला अखेर राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली आहे. २०१० मध्ये राज्य विधिमंडळाने हा कायदा संमत करून मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला होता. मात्र केंद्र सरकारने त्यात काही सुधारणा सुचवल्या होत्या. त्या सुधारणा करून पुन्हा सुधारित कायदा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. आज राष्ट्रपतींनी सावकारी विरोधी कायद्याच्या मसुद्यावर स्वाक्षरी करून त्याला मंजुरी दिली.
Jan 10, 2014, 11:20 PM ISTलोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींची सही
भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यश मिळाले आहे. बहुचर्चित लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकावर बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे या लोकपाल विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाले आहे.
Jan 2, 2014, 08:09 AM ISTमोदींच्या ‘हुंकारा’साठी राष्ट्रपतींनी आवरला आपला दौरा!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी राष्ट्रपतींनी आपला पाटणा दौरा आवरता घेतलाय. राष्ट्रपतींनी आपला पाटण्याचा दौरा एका दिवसानं कमी करून राजधानीत एकदिवस आधी परतण्याचं मान्य केलंय.
Oct 10, 2013, 03:27 PM ISTतीन दिवसानंतर अखेर केनियातली धुमश्चक्री संपली, ६७ ठार
नैरोबी शॉपिंग मॉलला दहशतवाद्यांनी घेरल्यानंतर सुरु झालेली धुमश्चक्री अखेर संपुष्टात आलीय, अशी माहिती केनियाचे राष्ट्रपती उहुरू केन्यात्ता यांनी दिलीय. या दहशतवादी हल्ल्यात तीन भारतीयांसहीत ६७ जण ठार झालेत.
Sep 25, 2013, 09:52 AM ISTपाकच्या राष्ट्रपतीपदी ममनून यांनी घेतली शपथ!
भारतात जन्मलेले आणि राष्ट्राध्यक्ष नवाझ शरीफ यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे ममनून हुसैन यांनी सोमवारी पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.
Sep 10, 2013, 02:13 PM ISTजन्माष्टमीच्या राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा!
आज देशभरात जन्माष्टमीची धूम पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही कृष्ण जन्माष्टमीच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आणि सर्व लोक प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग अवलंबतील अशी आशा व्यक्त केली.
Aug 28, 2013, 08:15 AM ISTराष्ट्रपतींना मिळणार ७४ चाबकाचे फटके!
देशाच्या निवडणूक नियमांचं उल्लंघन करणाच्या आरोपाखाली राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांना ७४ चाबकाचे फटक्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
May 15, 2013, 04:51 PM ISTराष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराचे वितरण
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या महनीय व्यक्तींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा आणि प्रा. रॉडेम नरसिंह यांना ‘पद्मविभूषण’, ज्येष्ठ लेखक-कवी मंगेश पाडगावकर यांना ‘पद्मभूषण’, तर अभिनेते नाना पाटेकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
Apr 21, 2013, 08:26 AM ISTराष्ट्रपतींचं आणखी पाच जणांच्या फाशीवर शिक्कामोर्तब
अजमल कसाब आणि अफजल गुरूच्या फाशीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आणखी सात द्या अर्ज निकालात काढलेत.
Apr 4, 2013, 12:46 PM IST‘गुरूला फाशी : बाळासाहेबांची मागणी पूर्ण’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहा वर्षांपासून गुरूला फाशी देण्याची मागणी करीत होते. गुरू हा सरकारचा जावई आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला होता, त्यांची ही मागणी उशिरा का होईना मान्य झाली. यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
Feb 9, 2013, 12:24 PM ISTराष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा रद्द
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा मुंबई दौरा रद्द झालाय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुंबईच्या दोन दिवसांच्या दौ-यावर येणार होते. पण त्यांनी त्यांचा दौरा रद्द केलाय. राष्ट्रपती भवनच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.
Nov 15, 2012, 09:46 AM ISTकसाबसंदर्भात शिवसेनेचं राष्ट्रपतींना पत्र
भारताच्या सुप्रीम कोर्टानेही अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे कसाबला फाशी होणार आहे. मात्र त्यासाठी सर्वांत आवश्यक गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींची परवानगी. यासाठीच शिवसेनेने राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे.
Sep 6, 2012, 10:04 AM ISTभ्रष्टाचाराने देश पोखरलाय - राष्ट्रपती मुखर्जी
www.24taas.com, नवी दिल्ली
देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ती काढून टाकली पाहिजे. यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा, असे नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ६६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला दिलेल्या अभिभाषणात सांगितले.
भ्रष्टाचाराने देशाला पोखरले आहे. त्यामुळे देशाची मोठी हानी होत आहे. भ्रष्टाचारासह दहशतवाद, गरीबी आणि जनतेच्या आरोग्य विषयक समस्येला प्राधान्य देऊन त्या आधी सोडविल्या पाहिजेत, असे राष्ट्रपती म्हणालेत.
भ्रष्टाचार देशाच्या प्रगतीला मारक ठरत आहे. त्यातच भ्रष्टाचाराविरोधात जनतेच्या भडकलेल्या भावनांचा मी आदर करतो, मात्र त्यावर प्रभावीपणे अंकुश ठेवला जात नसल्याचे मुखर्जींनी मान्य केले.
देशातील शासकीय संस्था भारतीय संविधानाचे मजबूत स्तंभ आहे. त्या उद्वस्त करता येणार नाही. परंतु, त्यात सुधारणा करता येऊ शकतात, असेही मुखर्जींनी म्हटले. त्यामुळे अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांना अप्रत्यक्ष राष्ट्रपतींनी टोला लगावला.
जनतेने न्यायप्रक्रीयेवर विश्वास ठेवला पाहिजे. जनतेला राज व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु कायदा तयार करण्याचा अधिकार संविधानाला आहे. आणि त्याला न्याय देण्याचा अधिकार न्याय प्रक्रियेला आहे. आपण हा अधिकार न्याय संस्थांकडून हिरावून घेऊ शकत नाही, असेही अण्णा आणि बाबांना सुनावताना सांगितले की, जर अधिकारी हुकूमशाहा बनले तर मात्र लोकशाहीचे मोठे नुकसान होत असते. शालिनता आणि सहिष्णुता लोकशाहीचा मूळ आधार आहे.
Aug 14, 2012, 10:18 PM ISTप्रणवदा राष्ट्रपतीपदावर विराजमान
भारताचे नवे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केलीय. प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलीय. भारताचे सरन्यायाधीश एच. एस. कपाडिया यांच्याकडून त्यांनी शपथ घेतली.
Jul 25, 2012, 03:21 PM ISTघानाचे राष्ट्रपती जॉन मिल्स यांचं निधन
घानाचे राष्ट्रपती जॉन अता मिल्स यांचं मंगळवारी सैनिकी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. आजारी पडल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झालाय.
Jul 25, 2012, 10:56 AM IST