www.24taas.com, नवी दिल्ली
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या महनीय व्यक्तींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा आणि प्रा. रॉडेम नरसिंह यांना ‘पद्मविभूषण’, ज्येष्ठ लेखक-कवी मंगेश पाडगावकर यांना ‘पद्मभूषण’, तर अभिनेते नाना पाटेकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. एस. पिल्लई आणि डॉ. बी. एन. सुरेश, भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. सरोज वैद्यनाथन यांनाही ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जसपालसिंग भट्टी आणि दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. खन्ना यांच्या पत्नी डिंपल कपाडिया यांनी हा सन्मान स्वीकारला.
पुरस्काराचे मानकरी
पद्मविभूषण
प्रा. रॉडेम नरसिंह, चित्रकार सय्यद हैदर रझा
पद्मभूषण
प्रा. सत्य नाधम अत्लुरी, डॉ. महाराज किशन भान, आदी गोदरेज, शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खान, डॉ. नंदकिशोर शामराव लाउड, मंगेश पाडगावकर, शास्त्रज्ञ डॉ. ए. एस. पिल्लई आणि डॉ. बी. एन. सुरेश, डॉ. सरोजा वैद्यनाथन.
मरणोत्तर पद्मभूषण
जसपाल भट्टी, राजेश खन्ना
पद्मश्री
नाना पाटेकर, रमेश सिप्पी, योगेश्वर दत्त, विजय कुमार, डिझायनर रितू कुमार, मनिंद्र अग्रवाल, एव्हरेस्टवीरांगना प्रेमलता अग्रवाल, चित्रकार एस. शाकीर अली, भौतिकशास्त्रज्ञ मुस्तानसिर बर्मा, सिनेमॅटोग्राफर अपूर्वा किशोर, शास्त्रज्ञ जे. गौरीशंकर, विश्विकुमार गुप्ता, कर्करोगतज्ज्ञ प्रमोद कुमार जुल्का, रेडियो अभ्यासक शरद पांडुरंग काळे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख मिलिंद प्रल्हाद कांबळे, गुलशन राज खत्री, संगीतकार हिल्दामित लेप्चा, लेखक जे. मालसावमा, कार्डिओलॉजिस्ट गणेशकुमार मनी, एंडोस्कोपी तज्ज्ञ अमित प्रभाकर मेदेव, गायिका सुधा मल्होत्रा मोटवाने, सामाजिक कार्यकर्त्या रीमा नानावटी, नेत्रतज्ज्ञ सुंदरम नटराजन आणि लेखक पत्रकार देवेंद्र पटेल, मानवशास्त्राचे प्राध्यापक क्रिस्तोफेर पिन्ने, दलित उद्योजक कल्पना सरोज, सूफी संगीतकार उस्ताद गुलाम सझनवाझ, शिक्षणतज्ज्ञ जगदीश प्रसादसिंग, प्रा. बलवंत ठाकूर, कृष्णास्वामी विजयराघवन.