‘गुरूला फाशी : बाळासाहेबांची मागणी पूर्ण’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहा वर्षांपासून गुरूला फाशी देण्याची मागणी करीत होते. गुरू हा सरकारचा जावई आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला होता, त्यांची ही मागणी उशिरा का होईना मान्य झाली. यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 9, 2013, 12:24 PM IST

www.24taas.com, मुंबई,
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहा वर्षांपासून गुरूला फाशी देण्याची मागणी करीत होते. गुरू हा सरकारचा जावई आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला होता, त्यांची ही मागणी उशिरा का होईना मान्य झाली. यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
अफजल गुरूला फाशी देण्यावरून आम्ही वारंवार सरकारवर टीका केली. सरकारने हिम्मत दाखवून फाशी दिली. त्यामुळे सरकारही अभिनंदनास पात्र ठरले आहे. गृहमंत्र्यालयाने अफजलच्या फाशीबाबत निर्णय घेतल्याने त्यांचेही अभिनंदन आहे. त्याचबरोबर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेही अभिनंदन, असे प्रतिक्रिया खा. राऊत यांनी दिली.
युपीए सरकारवर आम्ही वारंवार टीका करीत आलोय. उशिरा होईना अफजल गुरूला फाशी दिल्याने आम्ही राष्ट्रपतींचे अभिनंदन करतो. राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आहेत. कदाचित फाशी देण्यावर निर्णय घेण्यासाठी त्यांनी सरकारला सूचवले असावे, असे राऊत म्हणाले.

अफजलच्या फाशीचा राजकीय फायदा मिळेल, असे सरकारला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण याउलट फाशी द्यायला एवढा उशीर का झाला, असा सवाल जनता उपस्थित करेल.
अबु जिंदाल, अफजल गुरु, अजमल कसाब असे दहशतवादी भारतात प्रवेश करू शकणार नाही यासाठी सतर्क राहायला हवे, असा सल्लाही राऊत यांनी यावेळी दिला.