राष्ट्रपती

प्रणवदा आज घेणार शपथ

प्रणव मुखर्जी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधिश एच. एस. कपाडिया प्रणव मुखर्जी यांना शपथ देतील.

Jul 25, 2012, 08:28 AM IST

गोंडवाना विद्यापीठ म्हणतं 'प्रणवदाच राष्ट्रपती'

चंद्रपूर-गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचा अनोखा प्रताप पुढं आलाय. विद्यापीठाच्या एफवायबीएच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात १४वे राष्ट्रपती म्हणून चक्क प्रणव मुखर्जींच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय.

Jul 19, 2012, 06:22 PM IST

राज ठाकरे देणार का काँग्रेसला पाठिंबा?

राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या होतेय आणि या निवडणुकीत काँग्रेसनं मनसेकडेही पाठिंबा मागितला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.

Jul 18, 2012, 05:40 PM IST

प्रणव मुखर्जींमध्येच क्षमता आहे- बाळासाहेब

प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तीप्रदर्शनावर शिवसेनाप्रमुखांनी टीका केली आहे. याचबरोबर प्रणव मुखर्जींना दिलेला पाठिंबा म्हणजे यूपीएला दिलेला पाठिंबा नव्हे, असंही शिवसेनाप्रमुख म्हणाले.

Jun 30, 2012, 06:52 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी कलामांचा नकार

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. कलामांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ते निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच त्यांनी राजकीय पक्ष आणि जनतेचेही आभार मानलेत.

Jun 18, 2012, 04:06 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जीच आघाडीवर

2007 मध्ये काँग्रेसनं राष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार अखेरच्या क्षणी जाहीर केला होता. मात्र यावेळी हे काम सोप्पं दिसत नाही. यावेळी काँग्रेस आणि यूपीएवर सहका-यांचाच अधिक दबाव आहे. त्यामुळे सर्वसंमतीचा विचार केल्यास प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

Jun 11, 2012, 03:41 PM IST

प्रणव मुखर्जी होणार राष्ट्रपती?

राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीची दिल्लीत जोरदार तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.

Jun 9, 2012, 10:23 AM IST

मी पंतप्रधान आहे तेच बरयं- मनमोहन

पंतप्रधान मनमोहन सिंग युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील ही अटकळ खुद्द पंतप्रधानांनीच फेटाळून लावली आहे. जिथं आहे तिथं मी खूष आहे असं सांगत त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

May 30, 2012, 03:40 PM IST

ममता बॅनर्जींची पसंती मीरा कुमारांना

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर नाव असलेल्या प्रणव मुखर्जींना त्यांच्या राज्यातूनच मोठा विरोध होतोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुखर्जींच्या ऐवजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांना पसंती दिली आहे.

May 22, 2012, 12:38 PM IST

'डीएमके'चाही प्रणवदांना पाठिंबा

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची आगेकूच कायम आहे. डीएमके या पक्षानेही आता मुखर्जी यांच्या नावाला संमती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या नावाला आमचा विरोध नाही, असं तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांनी स्पष्ट केलं.

May 5, 2012, 07:37 PM IST

आत्महत्येसाठी हवीय राष्ट्रपतींची परवानगी

लखनऊमधील फत्तेपूर येथे एक अजब प्रकार पुढे आला आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे. त्यावर एका पोलीस हवालदारांने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनाच साकडे घातले आहे.वरिष्ठांकडून छळ होत असल्याने जीवनाला कंटाळलेल्या पोलीस हवालदाराला आत्महत्या करायची आहे, तसे त्यांने राष्ट्रपतीनाच पत्र लिहिले आहे.

May 4, 2012, 12:54 PM IST

कोण बनणार राष्ट्रपती?

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरुन राजकारण चांगलंच तापतंय. राष्ट्रपती पदाची निवडणूक सर्वसहमतीनं व्हावी आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनी म्हटलंय.

May 2, 2012, 06:21 PM IST

शर्यत राष्ट्रपतीपदाची

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी वातावरण तापायला सुरुवात झालीय.. नुकतेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस घायाळ झाली असतांनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रपती निवडकणुकीच्या पीचवर गुगली टाकला

Apr 24, 2012, 12:00 AM IST

अब्दुल कलाम पुन्हा होणार राष्ट्रपती?

जुलै महिन्यात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. काँग्रेसनं आपल्याच पक्षातील उमेदवारासाठी जोरदार फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.

Apr 23, 2012, 11:40 AM IST

राष्ट्रपतींचा सहकारी साखर कारखाना लिलावात!

राष्ट्रपतींच्या सहकारी साखर कारखान्याला नुकतंच लिलावाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. अशीच वेळ आता पुणे जिल्ह्यातल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर आली आहे. अशा वेळी कारखान्याला मदत करण्याऐवजी नेत्यांनी कानावरच हात ठेवले आहेत.

Jan 12, 2012, 09:44 PM IST