सेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच

सत्तासहभागाबाबत सेना भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच असून आता ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार आहे. आज संध्याकाळी याबाबत चर्चा होणार असून याबाबत निकाल लागेपर्यंत धर्मेंद्र प्रधान मुंबईतच तळ ठोकून रहाणार आहेत.

Updated: Nov 29, 2014, 11:19 AM IST
सेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच  title=

मुंबई: सत्तासहभागाबाबत सेना भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच असून आता ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार आहे. आज संध्याकाळी याबाबत चर्चा होणार असून याबाबत निकाल लागेपर्यंत धर्मेंद्र प्रधान मुंबईतच तळ ठोकून रहाणार आहेत.

शिवसेनेला चार कॅबिनेट तर सहा राज्यमंत्रिपदे देण्याची तयारी भाजपानं दर्शविली असल्याचं समजतंय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे ठेवला असल्याचं कळतं. सेना उपमुख्यमंत्रिपदावर ठाम असून, याबाबतच्या वाटाघाटी अपूर्ण राहिल्यानं चर्चा आणखी काही दिवस सुरू राहतील, असे संकेत आहेत.

धर्मेद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी दुपारी भाजपाच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपाचे संघटनमंत्री सुरेश भुसारी यांच्यासोबत दीड तास बैठक झाली. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हेही बैठकीत सहभागी झाले. त्यानंतर प्रधान-पाटील हे सव्वापाच वाजता मातोश्रीवर जाण्यास निघाले. मातोश्रीवरील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची महापौर बंगल्यावर बैठक झाली. नंतर रात्री उशीरा केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि सुभाष देसाई हे सह्याद्रीला धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांना भेटले.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.