उपमहापौरपदासाठी सेना X भाजप

नागपूरमध्ये उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. भाजपनं महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर केलेत. तर शिवसेनेनं उपहापौरपदासाठी अलका दलाल यांना उमेदवारी दिली.

Updated: Mar 1, 2012, 07:25 PM IST


www.24taas.com, नागपूर

 

नागपूरमध्ये उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. भाजपनं शिवसेनेला उपमहापौर देण्यास नकार दिला. भाजपनं महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर केलेत. तर शिवसेनेनं उपहापौरपदासाठी अलका दलाल यांना उमेदवारी दिली.

 

शिवसेनेचे फक्त सहाच नगरसेवक निवडणून आलेले आहेत. त्यामुळं स्वबळावर निव़डणून येणं त्यांच्यासाठी अशक्य आहे. अशा परिस्थितीत त्यांना कोण पाठिंबा देतं का याकड सगळयांचं लक्ष लागलंय. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती झाली होती. मात्र सत्तेत वाटा देताना मात्र भाजपनं शिवसेनाला ठेंगा दिलाय. भाजपनं विश्वासघात केल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी उपमहापौर शेखर सावरबांदे यांनी केलाय.

 

महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक त्यापक्षाचा महापौर आणि ज्या पक्षाचे तुलनेनं कमी नगरसेवक असतील त्यांना उपमहापौरपद देण्याच ठरलं आहे. त्यानुसार सहा नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेनं यावेळी उपमहापौरपदावर दावा केला होता. मात्र भाजपनं ऐनवेळी त्यांना उपमहापौरपद देण्यास विरोध केलाय.

 

स्थानिक पातळीवर भाजपसोबत अनेक छोटे पक्ष आणि गट आहेत. या गटांना सत्तेत सामावून घेण्यासाठी उपमहापौरपदाचा कार्य़काळ विभागून देण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतय.