महायुतीच्या वचननाम्यातही आश्वासनांचा पाऊस!

मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या महायुतीने आज आपला वचननामा जाहीर करून मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. शिवसेना भवनात आयोजित एका पत्रकार परिषदेत महायुतीने हा वचननामा जाहीर केला.

Updated: Feb 9, 2012, 05:27 PM IST

www.24taas.com,मुंबई

मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या महायुतीने आज आपला वचननामा जाहीर करून मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. शिवसेना भवनात आयोजित एका पत्रकार परिषदेत महायुतीने हा वचननामा जाहीर केला.

 

यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आरपीआयचे नेते रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनंगटीवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, दलित पँथर संघटनेचे अध्यक्ष नामदेव ढसाळ आणि इतर नेते उपस्थित होते.

 

महायुतीच्या वचननाम्यातील काही ठळक गोष्टी

1)      व्हर्च्युअल क्लास अधिक सक्षम करणार

2)      येत्या ३ वर्षात महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये कम्प्युटर

3)      जास्तीत जास्त रस्त्यांच काँक्रिटीकरण करणार

4)      रस्ते, शिक्षण आणि आरोग्यावर वचननाम्यात भर

5)      वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा करणार

6)      महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणार

7)      वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणखी १४ उड्डाणपूल

8)      रस्त्यांच्या कामांसाठी निरिक्षक नेमणार

9)      स्वयंरोजगारासाठी मराठी जनतेला प्राधान्य देणार

10)   जकात रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार

11)   गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न सोडविणार

12)   सर्व रुग्णांना आरोग्यपत्र देणार

13)   कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार

14)   विवाह नोंदणी, जन्ममृत्यूचे दाखले ऑनलाइन करणार

15)   वेळोवेळी रस्त्याच्या कामाची क्वालिटी ऑडीट करून रस्त्याचे आयुष्यमान वाढविणार

16)   बाह्य रुग्णांना स्वस्तर व गुणकारी औषधे उपलब्ध करून देणार

17)   किशोरी आरोग्य योजना राबविणार

18)   मधुमेह, एड्स रोगांना अटकाव करण्याची योजना

19)   शहरातील काही ठिकाणी वाहनतळ बांधणार