महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालं आहे. महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला १३६ तर भाजपला ६२ आणि आरपीआयला २९ जागा देण्यात आल्या आहेत. रामदास आठवलेंनी ३० जागांची अपेक्षा व्यक्त केली होती तर सेना-भाजपने २५ जागांची तयारी दर्शवली होती. अखेरीस आरपीआयच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत.

Updated: Jan 9, 2012, 03:46 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालं आहे. महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला १३६ तर भाजपला ६२ आणि आरपीआयला २९ जागा देण्यात आल्या आहेत. रामदास आठवलेंनी ३० जागांची अपेक्षा व्यक्त केली होती तर सेना-भाजपने २५ जागांची तयारी दर्शवली होती. अखेरीस आरपीआयच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत.

मागच्या आठवड्यात जागा वाटपासंदर्भात सेना भवनात महत्वपूर्ण बैठक झाली होती. कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कारणावरुन दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ बैठकीला हजेरी न लावताच परतले होते. आरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया ढसाळांनी त्यावेळेस व्यक्त केली होती.