Virendra Sehwag : भारताचा स्टार फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने आपल्या करिअरमध्ये 2 तिहेरी शतक लगावली. तो अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला फलंदाज आहे. एवढंच नाही तर जागतीक क्रिकेटमध्येही हाताच्या बोटावर मोजण्या इतके खेळाडूच त्यांच्या करिअरमध्ये तिहेरी शतक ठोकू शकले आहेत. वीरेंद्र सेहवागने त्याच्या करिअरमध्ये अशा अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. सेहवागनंतर आता त्याचा मुलगा देखील बापाच्याच पावलावर पाऊल ठेऊन पुढे क्रिकेटमध्ये करिअर करत आहे. सेहवागचा मुलगा आर्यवीर (Aryveer Sehwag) याने दमदार द्विशतक ठोकण्याची कामगिरी केली, मात्र त्याचे तिहेरी शतक मात्र हुकले.
आर्यवीर सेहवागने शिलांगच्या एमसीए क्रिकेट ग्राउंडवर मेघालय विरुद्ध कूच बिहार ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीकडून खेळताना द्विशतक झळकावले. तर तिसऱ्या दिवशी सुद्धा त्याने जोरदार फटकेबाजी केली आणि तो तिहेरी शतकाच्या जवळ पोहोचला. मात्र त्याचं तिहेरी शतक याच्या 3 धावांनी हुकलं. आर्यवीर सेहवागने दिल्लीकडून खेळताना 297 धावा केल्या. तो वडिलांप्रमाणे तिहेरी शतक ठोकू शकला नाही. मात्र त्याने वयाच्या 17 व्या वर्षीच आपण क्रिकेटमध्ये भविष्यात मोठी कामगिरी करू शकतो हे सिद्ध केलं. कूचबिहार ट्रॉफी ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अंडर-19 खेळाडूंसाठी आयोजित केलेली चार दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. मुलगा आर्यवीरने केलेल्या कामगिरीनंतर वीरेंद्र सेहवागने त्याचे तोंडभरून कौतुक केले. तिसऱ्या दिवशी आर्यवीरने आपल्या ओव्हरनाईट स्कोअरमध्ये 97 धावा जोडल्या. आरएस राठौर या गोलंदाजाने आर्यवीरला बाद केले यावेळी त्याने 309 बॉलमध्ये 297 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 51 चौकार आणि 3 षटकार मारले.
हेही वाचा : मोठी बातमी! 'या' तारखेला सुरु होणार IPL 2025, BCCI ने पुढच्या 3 सीजनबाबत घेतला निर्णय
Well played aaryavirsehwag . Missed a Ferrari by 23 runs. But well done, keep the fire alive and may you score many more daddy hundreds and doubles and triples. Khel jaao pic.twitter.com/4sZaASDkjx
— Virender Sehwag (@virendersehwag) November 22, 2024
सेहवागने लिहिले की, 'खूप छान खेळलास आर्यमन. फक्त 23 धावांनी तुझी फरारी चुकली. पण शाब्बास, हाच जोश कायम ठेव आणि पुढे अजून द्विशतक आणि तिहेरी शतक बनव'. सेहवागने 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध मुलतान टेस्टमध्ये 309 धावांची कामगिरी केली होती. तर 2008 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईमध्ये 319 धावा केल्या. सेहवागने आपला मुलगा आर्यमन याला फरारी गिफ्ट करणार असे आश्वासन दिले होते. सेहवागने कॉमेंटेटर हर्षा भोगले यांच्याशी बोलताना म्हंटले होते की, 'माझ्या मुलांना माहितीये की मी टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्डस् केले आहेत. म्हणून मी त्यांना सांगितले होते कि की जर तुम्ही शालांतर क्रिकेट सामन्यातही 319 धावांचा आकडा पार केला तरी मी तुम्हाला फरारी गिफ्ट करेन'. पण वडिलांचा रेकॉर्ड ब्रेक करण आर्यमनला शक्य झालं नाही त्यामुळे सेहवाग मुलाला दिलेलं वचन पूर्ण करू शकला नाही. सध्या दिल्लीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त Ferrari Roma ही आहे. त्याची किंमत जी जवळपास 3.76 कोटींच्या घरात आहे.