मनसे

मनसे आमदार राम कदमांवर अॅट्रॉसिटी

घाटकोपर मतदारसंघाचे मनसेचे आमदार राम कदम यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Apr 22, 2014, 03:47 PM IST

राज ठाकरेंचे भुजबळांच्या संपत्तीवर बोट, सेनेवर तोफ

महात्मा फुल्यांच्या नावाने संघटना चालवायची. त्यांच्या नावावर समतेचे राजकारण केल्याचे दाखवायचे. मात्र, संस्थांना फुलेंएेवजी आपली नावे द्यायचे हे यांचे उद्योग. छगन भुजबळ कुटुंबीयांची कोट्यवधींची संपत्ती वाढतेच कशी? याबाबत त्यांने कोठे किती संपत्ती आहे, याचा दाखला देत भुजबळांना टार्गेट केले.

Apr 19, 2014, 10:50 PM IST

दक्षिण मध्य मुंबई - तिरंगी लढतीतील जातीय समीकरणं

दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेमध्ये तिरंगी लढत होतंय. विविध जाती-धर्मातील लोक इथं राहत असल्यानं निवडणुकीत जातीय समीकरणांना अधिक महत्त्व आलंय.

Apr 18, 2014, 09:39 AM IST

मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एक जखमी

शहरातील मोनिका हॉलमध्ये झालेल्या वकिलांच्या बैठकीत मनसे कार्यकर्त्यांत हाणामारी झाली असून, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने मनसेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Apr 17, 2014, 05:28 PM IST

पुण्यात पैसे वाटपावरून कदम, पायगुडेंविरोधात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या मतदानाला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असताना पुणे शहराचे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे अडचणीत आले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कदम यांना अटक करावी अशी मागणी मनसेनं केली आहे.

Apr 16, 2014, 12:52 PM IST

बीडमध्ये अखेर गोपीनाथ मुंडेंच्या मदतीला मनसे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बीडचे भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Apr 15, 2014, 07:27 PM IST

पुण्यात पैसे वाटण्यावरून काँग्रेस-मनसेत धुमशान

पुण्यातील रास्ता पेठेत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.

Apr 15, 2014, 07:18 PM IST

दोन्ही काँग्रेसने जातीपातीची पिलावळ पोसली - राज ठाकरे

राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जातीपातीचे राजकारण करीत आहे. त्यांनीच जातीपातीची पिलावळ बोसली आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडीवर केली. त्याचवेळी महायुतीला लक्ष्य केले. मनसेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचार सभेत राज यांनी हल्लाबोल केला.

Apr 15, 2014, 03:40 PM IST

नाशिकमध्ये `पॉलिटिकल लव्ह ट्रँगल`!

लव्ह ट्रँगल... हा बॉलीवूड सिनेमांचा हिट फॉर्म्युला... सध्या असाच राजकीय प्रेमाचा त्रिकोण सध्या राज्याच्या राजकारणात पहायला मिळतोय.

Apr 15, 2014, 12:12 PM IST

उर्वशी राज ठाकरे `मनसे` प्रचारात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या मदतीला त्यांची धर्मपत्नी शर्मिला याही निवडणूक आखाड्यात उतरल्यात. आता तर राज यांची लाडली उर्वशी राज ठाकरे प्रचारात सहभागी झाली आहे. पुण्यात दीपक पायगुडे यांच्यासाठी बाईक रॅली काढून प्रचार केला आहे.

Apr 15, 2014, 12:02 PM IST

नाशकात मनसेचा नमो नमोचा जप, मनसेच्या पत्रकांमध्ये मोदी!

भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो छापून मनसेनं सुरू केलेल्या पत्रकबाजीवर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय.

Apr 14, 2014, 09:38 AM IST

मनसेचा विषय माझ्यासाठी बंद: उद्धव ठाकरे

माझ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय हा संपलेला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं मनसेवर टीका केली आहे.

Apr 13, 2014, 07:02 PM IST

विकासाचं सोंग आणून आघाडीचे मंत्री लाटतात जमिनी

काँग्रेस आघाडीतले मंत्री हे नुसतेच गब्बर नाहीत, तर योजनाबद्धरित्या यांनी महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या जमिनी मोठ्या प्रमाणावर लाटल्या आहेत. त्या जमिनी लाटताना योजना आखून पद्धतशीरपणे लाटल्या आहेत. आधी स्वतःसाठी जमिनी शोधतात त्या विकत घेतात आणि नंतर सरकारी तिजोरीतून त्या जागेवर प्रकल्प मंजूर करून विकासाचा सोंग आणतात, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी महाड इथल्या सभेत केली आहे.

Apr 13, 2014, 12:26 PM IST

राज-गडकरी मैत्री, पुण्यात मुंडे गटाला तडाखा

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार देण्यामागे भाजपमधील एका गटाचाच सहभाग असून, त्याबद्दलची नाराजी तेथील कार्यकर्त्यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह; तसेच अन्य नेत्यांपर्यंत पोचवली आहे.

Apr 11, 2014, 04:46 PM IST

`बिनबुलाया मेहमान`ला सेनेकडून न मागितलेले सल्ले!

भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी मनसेला दिलेल्या धक्क्यामुळे शिवसेना चांगलीच सुखावलीय. राजनाथ सिंह यांनी लगावलेल्या टोल्यावरून काही तरी शिका, असा सल्ला शिवसेनेनं मनसेला दिलाय.

Apr 11, 2014, 04:05 PM IST