www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
माझ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय हा संपलेला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं मनसेवर टीका केली आहे.
कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आले होते. मनसे म्हणजे काँग्रेसनं निर्माण केलेला सापळा आहे, असे ही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. तसेच राज्यात महायुती सगळ्याच जागा जिंकणार आहे, असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलुन दाखवला.
मतांची विभागणी टाळण्यासाठी मनसेला महायुतीत घ्यावे, असे विधान भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. या वर उद्धव ठाकरे म्हणाले, "असे कोणीही बोलले नाही. मनसे हा काँग्रेसने लावलेला सापळा आहे. मी या सापळ्यात अडकणार नाही. भाजपचीही तीच भूमिका असून त्यावर पडदा पडला आहे".
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले म्हणाले, "ही लोकसभा निवडणूक म्हणजे महासंग्राम असून लोकशाहीचे महायुद्ध आहे. ही निवडणूक देशाची दिशा ठरवणारी आहे. मात्र अशाचवेळी मुलायमसिंग यादव सारखी मंडळी गलिच्छ भाषेत वक्तव्य करतात. हे पाहता उद्या आपले कुटुंब तरी सुरक्षित राहणार काय, अशी स्थिती तयार झाली आहे.`` याच मुलायम सिंगांचा काँग्रेसला पाठिंबा आहे आणि उद्याही जागा कमी पडल्या तर मुलायसिंगांचा पाठिंबा काँग्रेस घेईल. या दिशेने जायचे का? अर्थात अशी परिस्थिती येणार नाही. कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील.`` असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दर्शवला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.