राज ठाकरेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
मरा पण नेत्यांना मारून मरा, या वादग्रस्त विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडले आहे.
Apr 9, 2014, 10:03 PM ISTऔरंगाबाद मनसे में 'ये सन्नाटा क्यों है भाई`
औरंगाबादचं हे मनसे कार्यालय़ सुनंसुनं आहे. औरंगाबादमध्ये मनसेनं कोणताही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे प्रचार करायचा कोणाचा असा प्रश्न पडल्यामुळे कार्यकर्ते निवांत आहेत.
Apr 9, 2014, 01:49 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत मनसेकडून `नोटा`
लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात मनसे अन्य जागांवर काय भूमिका घेणार, कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
Apr 9, 2014, 10:28 AM ISTशिवसेनेची बिकट परिस्थिती, मुद्दे नसल्याने वडा, सूपवर - राणे
शिवसेनेची परिस्थिती बिकट आहे, त्यांच्याकडे मुददे नाहीत. म्हणून ते वडा आणि सूपवर आलेत, अशी टीका नारायण राणेंनी पुण्यात केलीय.
Apr 8, 2014, 08:30 PM ISTराजनाथ सिंहांनी धुडकावला राज ठाकरेंचा पाठिंबा!
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी राज ठाकरेंच्या मनसेला उद्देशून चांगलाच टोला लगावलाय. `मी ऐकलंय की कुणीतरी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतंय... पण मोदींना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांना महायुतीत सामील व्हावं लागेल.. किंवा त्यांना आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करावा लागेल. त्याशिवाय केवळ पाठिंबा देण्याच्या भाषेला काहीच अर्थ नाही, असं राजनाथ सिंह यांनी पुण्यात बोलताना सांगितलं.
Apr 8, 2014, 08:21 PM ISTऔरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा कोणता झेंडा घेऊ हाती?
औरंगाबादमधील प्रचार आता शिगेला पोहचलाय. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमात कामाला लागलेत. मात्र मनसे कार्यकर्ते मात्र या सगळ्यापासून दूर आहेत. अजूनही कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडलाय.
Apr 8, 2014, 07:48 PM ISTमनसे लोकसभा निवडणुकीसाठी कोकणात `नोटा` वापरणार
लोकसभा निवडणुकीत रंगतदान लढतीमध्ये कोकणचा समावेश आहे. याठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात काम करण्याची भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला उमेदवार दिलेला नाही. आपली मते कोणाच्या वाट्याला जाऊ नयेत म्हणून मनसे नकाधिकार म्हणजेच `नोटा` (यापैकी कोणीही नाही) याचा वापर करणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणार नसल्याने काँग्रेसला याचा फटका बसू शकतो.
Apr 8, 2014, 04:40 PM ISTमनसेच्या दीपक पायगुडेंना होतेय कलमाडी, बागवेंची मदत
निवडून दिल्यानंतर मी समाजासाठी काय केले हे सांगता आले पाहिजे, असं म्हणत मनसेचे पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार “मला मदत केल्याशिवाय काँग्रेसच्या काहींना पर्याय नाही”, ही माहिती पायगुडेंनी दिली.
Apr 8, 2014, 01:10 PM IST`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान
वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Apr 7, 2014, 10:34 PM ISTशिवसेना-मनसेच्या राड्यानंतर...कोणी फटकारले
शिवसेना-मनसेत मुंबईत झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि मनसेवर मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केलीय.
शिवसेना आणि मनसे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असून आता लोकांना त्यांच्याकडून कोणत्याच अपेक्षा उरल्या नसल्याचा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगवालाय.
भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी-भाजप-मनसेत चुरस
ठाण्यातील भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले कपील पाटील यांच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष असणार आहे.
Apr 4, 2014, 08:49 AM ISTठाकरे बंधुंचं वाकयुद्ध राड्यातून रस्त्यावर!
शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यात कुटुंब कलह सुरू झालाय तर त्यांचा झेंडा खांद्यावर घेणारे शिवसैनिक आणि मनसैनिक एकमेकांना भिडलेत. आपापल्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन, रस्त्यावर तुफानी राडा करतायत.
Apr 3, 2014, 08:20 PM ISTमुंबईत शिवसेना-मनसेत रस्त्यावर जोरदार राडा
मुंबईतील जुने कस्टम हाऊसजवळ शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य़कर्ते एकमेकांना भिडलेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी एकमेकांना खुन्नस दिल्याने कार्यकर्ते हातातील झेंडे घेऊन तुटून पडले. यावेळी पोलिसांना न जुमानता कार्यकर्ते भिडलेत.
Apr 3, 2014, 01:08 PM ISTऔकात दाखवाल तर गप्प बसणार नाही - उद्धव
औकात दाखवाल तर गप्प बसणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजला ठाकरी शैलीत सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.
Apr 1, 2014, 07:05 PM ISTअभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत!
अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत प्रवेश करत आहेत. आतापर्यंत राजकारणापासून दूर पळणारा नाना सिस्टिम बदलण्यासाठी अखेर राजकारणात पाऊल टाकतोय. येत्या १ मेला नाना मनसेत प्रवेश करणार आहे.
Apr 1, 2014, 01:16 PM IST