मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एक जखमी

शहरातील मोनिका हॉलमध्ये झालेल्या वकिलांच्या बैठकीत मनसे कार्यकर्त्यांत हाणामारी झाली असून, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने मनसेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Updated: Apr 17, 2014, 07:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. यात एक कार्यकर्ता जखमी झालाय. या वादामुळे मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील मोनिका हॉलमध्ये झालेल्या वकिलांच्या बैठकीत मनसे कार्यकर्त्यांत हाणामारी झाली असून, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने मनसेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षाने राजू पाटील यांना उमेवारी दिल्याने पक्ष कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मात्र कार्यकर्त्यांचे हवेदावे पुढे आल्याने हाणामारीची घटना घडल्याची चर्चा आहे. वकिलांची बैठक पक्ष उमेदवार राजू पाटील यांनी बोलाविली होती.
बैठकीला शहर उपाध्यक्ष कपिल अडसूळ १५ ते २0 कार्यकर्त्यांसह आले होते. हॉलमध्ये उपस्थित असलेल्या दिनेश आव्हाड यांनी शहर उपाध्यक्ष कपिल अडसूळसह कार्यकर्त्यांना फक्त निमंत्रितांसाठी बैठक असल्याचे स्पष्ट करून बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आलेल्या कपिल अडसूळसह कार्यकर्त्यांनी दिनेश आव्हाडला मारहाण केली आहे. आव्हाडवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.