पाकिस्ताननंतर बांगलादेशचाही IPL मधून पत्ता कट, ऑक्शन दरम्यान झाला मोठा गेम

IPL 2025 Auction :  बीसीसीआयने काही वर्षांपूर्वीच आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली होती. त्यानंतर आता पाकिस्तान सोबतच आयपीएलमधून बांगलादेश खेळाडूंचाही पत्ता कट झाला आहे. 

पुजा पवार | Updated: Nov 28, 2024, 05:14 PM IST
पाकिस्ताननंतर बांगलादेशचाही IPL मधून पत्ता कट, ऑक्शन दरम्यान झाला मोठा गेम  title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Mega Auction : जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असलेल्या इंडियन प्रीमियर लीगसाठी (IPL 2025)  24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. यंदाचं ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडलं असून यात 577 खेळाडूंवर बोली लागली तर यापैकी 182 खेळाडूंवर पैसे खर्च करून फ्रेंचायझींनी त्यांना संघात घेतले. तर उर्वरित सर्व खेळाडू हे अनसोल्ड ठरले.  बीसीसीआयने काही वर्षांपूर्वीच आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली होती. त्यानंतर आता पाकिस्तान सोबतच आयपीएलमधून बांगलादेश (Bangladesh) खेळाडूंचाही पत्ता कट झाला आहे. 

ऑक्शनमध्ये  62 विदेशी खेळाडूंना मिळाली टीम : 
 

यंदा आयपीएल 2025 ऑक्शनमध्ये एकूण 10 संघाचा सहभाग होता तर तब्बल 577 खेळाडू यंदाच्या ऑक्शनमध्ये सहभागी झाले होते. ऑक्शनमध्ये यंदा  फ्रेंचायझींनी जवळपास 639.15 कोटी रुपये खर्च करून खेळाडूंना आपल्या संघांची जोडले. जवळपास 1500 हुन अधिक खेळाडूंनी ऑक्शनसाठी नावं नोंदवली होती, मात्र यातून 182 खेळाडूंना संघांनी विकत घेतले. यात लखनऊ सुपर जाएंट्सने ऋषभ पंतला 27 कोटींना विकत घेतले, त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर त्यापाठोपाठ पंजाबने श्रेयस अय्यरसाठी 26.75  कोटी तर केकेआरने व्यंकटेश अय्यरसाठी 23.75  कोटी रुपये मोजले. ऑक्शनमध्ये खरेदी केलेल्या 182 खेळाडूंमध्ये 62 विदेशी खेळाडू आहेत. 

हेही वाचा : IPL ऑक्शनमुळे भारत सरकारची चांदीच चांदी, तिजोरीत जमा होणार तब्बल 900000000 रुपये, पण ते कसं?

 

बांगलादेशच्या 12 खेळाडूंचा समावेश : 

बांगलादेशातील जवळपास 12 खेळाडूंनी यंदाच्या मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. मात्र यापैकी फक्त 2 खेळाडूंची नाव ही ऑक्शनमध्ये घेण्यात आली आणि त्यापैकी एकाही खेळाडूवर 10 संघांपैकी एकानेही बोली लावली नाही. त्यामुळे ते खेळाडू अनसोल्ड ठरले. बांग्लादेशच्या लिटन दास, तस्कीन अहमद, शाकिब अल हसन, मेहदी हसन मिराज, शोरिफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, मुस्ताफिजुर रहमान आणि रिशाद हुसैन या 12 खेळाडूंनी नाव नोंदवली होती. यापैकी केवळ मुस्ताफिजुर रहमान आणि रिशाद हुसैन यांना प्रत्यक्ष ऑक्शनसाठी निवडण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. 

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार : 

आयपीएल 2008 नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात बिघडलेली राजकीय परिस्थिती आणि दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावामुळे आयपीएलमध्ये पाकिस्तान खेळाडूंना खेळण्यास बंदी घालण्यात आली. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशमध्ये सत्तापलटानंतर तेथील हिंदूंवर अत्याचाराचे प्रमाण वाढू लागले. बांगलादेशमध्ये हिंदू पुजारी आणि इस्कॉनचे माजी प्रमुख चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना अटक करण्यात आली ज्याची जगभरात खूप चर्चा झाली.