भारत वि ऑस्ट्रेलिया 0

भारताची पुन्हा हाराकिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांनी पराभव

ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ३६ धावांनी पराभव झालाय. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला या सामन्यात केवळ ५ विकेट गमावताना १५० धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर मूनीने ७१ धावांची जबरदस्त खेळी केली. तर एलिस विलानीने ६१ धावा कुटल्या.

Mar 26, 2018, 02:05 PM IST

भारतासमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हान

तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताला जिंकण्यासाठी १८७ धावांची आवश्यकता आहे.

Mar 26, 2018, 12:02 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मंधानाने चौकार-षटकार मारत साजरे केले अर्धशतक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यांत जरी भारताचा पराभव झाला असला तरी स्मृती मंधानाच्या अर्धशतकाची चर्चा जोरदार झाली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना तिने समर्थपणे तोंड देत १६३.४१च्या सरासरीने ४१ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी केली. यात मंधानाने ११ चौकार आणि २ षटकार लगावले. याचाच अर्थ तिने ५६ धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने केल्या. 

Mar 22, 2018, 01:47 PM IST

महिला तिरंगी मालिका, भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टी-२० भारताच्या महिला क्रिकेट संघाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाच्या शानदार ६७ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ बाद १५२ धावा केल्या. 

Mar 22, 2018, 01:17 PM IST

अंडर १९ वर्ल्डकप, कर्णधार पृथ्वी शॉची दमदार खेळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 11:37 AM IST

ऑस्ट्रेलिया टीमच्या बसवर दगडफेक : फॅन्सनी मागितली माफी

गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवानंतर भारताच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरर्सच्या बसवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आता या चाहत्यांनी माफी मागितलीये. 

Oct 12, 2017, 04:55 PM IST

टी-२० सामन्यादरम्यान असे काही घडले की चहलला हसू आवरले नाही

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना रांचीमध्ये रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार नऊ विकेट्स राखून जिंकला. 

Oct 8, 2017, 06:21 PM IST

डकवर्थ लुईसनुसार भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलाय.सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने भारताला विजयासाठी ६ षटकांत ४८धावांचे आव्हान देण्यात आले होते. 

Oct 7, 2017, 10:41 PM IST

LIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०, सामन्यात पावसाचा व्यत्यय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.

Oct 7, 2017, 07:01 PM IST

कर्णधार स्टीव्हन स्मिथ टी-२० सीरिजमधून बाहेर, वॉर्नर करणार नेतृत्व

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ भारताविरुद्धच्या सीरीजमधून बाहेर झालाय. 

Oct 7, 2017, 04:42 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शनिवारी रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

Oct 6, 2017, 07:11 PM IST

२०१२नंतर टी-२०मध्ये भारताला हरवू शकला नाही ऑस्ट्रेलियाचा संघ

पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला ४-१ अशी धूळ चारल्यानंतर टी-२० मालिकेत विजयी परंपरा कायम राखण्यासाठी भारत सज्ज झालाय.

Oct 6, 2017, 04:58 PM IST

'या' कारणामुळे युवराज, रैनाला संघात स्थान नाही

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरीजनंतर बीसीसीआयने तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा केली. या संघात ३८ वर्षीय आशिष नेहराने तब्बल आठ महिन्यानंतर पुनरागमन केलंय. मात्र, दुसरीकडे सुरेश रैना, युवराज सिंग आणि अमित मिश्रा यांना मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.

Oct 3, 2017, 04:53 PM IST

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारत पुन्हा अव्वल

आस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज केलेय.

Oct 1, 2017, 09:36 PM IST

पाचव्या वनडेत भारताचा ऑस्ट्रेलियावर ७ विकेट राखून विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताने सात विकेट राखून दमदार विजय मिळवलाय. यासोबत पाच सामन्यांची मालिका भारताने ४-१ ने जिंकली.

Oct 1, 2017, 08:50 PM IST