महिला तिरंगी मालिका, भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टी-२० भारताच्या महिला क्रिकेट संघाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाच्या शानदार ६७ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ बाद १५२ धावा केल्या. 

Updated: Mar 22, 2018, 01:43 PM IST
महिला तिरंगी मालिका, भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव title=

मुंबई : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टी-२० भारताच्या महिला क्रिकेट संघाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाच्या शानदार ६७ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ बाद १५२ धावा केल्या. 

मिताली राज हिने १८ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरला या सामन्यात १३ धावा करता आल्या. वेदा कृष्णामूर्ती १५ धावांवर नाबाद राहिली. 

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचे आव्हान १८.१ षटकांत चार विकेट राखत पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथनी मूनीने ४५ धावा करत विजयाचा पाया रचला. तर एल्सी विलनीने २९ धावा केल्या. 

तिरंगी मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियासह इंग्लंडचा समावेश आहे. उद्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दुसरी टी-२० रंगणार आहे.