भारताची पुन्हा हाराकिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांनी पराभव

ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ३६ धावांनी पराभव झालाय. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला या सामन्यात केवळ ५ विकेट गमावताना १५० धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर मूनीने ७१ धावांची जबरदस्त खेळी केली. तर एलिस विलानीने ६१ धावा कुटल्या.

Updated: Mar 26, 2018, 02:05 PM IST
भारताची पुन्हा हाराकिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांनी पराभव title=

मुंबई : ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ३६ धावांनी पराभव झालाय. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला या सामन्यात केवळ ५ विकेट गमावताना १५० धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर मूनीने ७१ धावांची जबरदस्त खेळी केली. तर एलिस विलानीने ६१ धावा कुटल्या.

भारताकडून पूजा वस्त्रकरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर झुलन गोस्वामी, पूनम यादव आणि आरपी यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताकडून जेमिमा रॉड्रिग्यूसने सर्वाधिक ५० धावा केल्या. हरमनप्रीत कौर ३३ आणि अनुजा पाटीलने नाबाद ३८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूट हिने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

तिरंगी मालिकेतील भारताचा हा सलग तिसरा पराभव आहे. याआधी भारताला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव सहन करावा लागला होता.