बंगळुरु

गेलच्या खराब कामगिरीवर बोलला विराट कोहली

आईपीएल ९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमकडून ओपनिंग करणाऱ्या जगातला सर्वात धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल आउट ऑफ फॉर्म आहे. गेलने आतापर्यंत कोणतीही मोठी खेळी केली नाही. त्यामुळे त्याच्या खेळावरुन सध्या चर्चा सुरु आहे.

Apr 19, 2016, 01:34 PM IST

बंगळुरुचा पराभव करणाऱ्या डिकॉकचं वॉटसनने केलं कौतूक

आयपीएलच्या ९ व्या सीजनमध्ये रविवारी झालेल्या बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्यात बंगळुरुचं पारडं जड वाटत होतं पण मोठी-मोठी नावं असलेल्या संघाला मात्र काल पराभवाचा सामना करावा लागला.

Apr 18, 2016, 12:41 PM IST

फेसबूक-ट्विटरच्या त्रुटी दाखविल्या, झाला कोट्याधीश!

येथील एका तरुणाने फेसबूक आणि ट्विटरला त्यांच्या त्रुटी दाखवून दिल्यात. याबद्दल या तरुणाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Mar 9, 2016, 02:38 PM IST

बंगळुरु येथील अपघातात १३ भाविक ठार

 मदानायाकनहल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. स्टील घेऊन जाणारा ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्याने हा अपघात आज पहाटे झाला.

Feb 19, 2016, 03:43 PM IST

धावत्या खासगी बसमध्ये नर्सवर बलात्कार

दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणाची पुनरावृत्ती होस्कोट येथे घडली. धावत्या खासगी बसमध्ये नर्सवर बलात्कार करण्यात आला. बंगळुरुपासून ४० किलोमीटर अंतरावर होस्कोट येथे ही धक्कादायक घटना घडली. बलात्काराप्रकरणी दोघांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.

Nov 6, 2015, 06:18 PM IST

दोन लोक बलात्कार करतात तो गॅंगरेप नाही : कर्नाटकचे गृहमंत्री

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी धक्कादायक बेताल वक्तव्य केले आहे. गँगरेपसाठी दोघे नाही तर किमान ३ ते ४ लोकांची गरज असते, असे वादग्रस्त वक्तव्य के.जे. जॉर्ज यांनी केले आहे. इंग्रजी न्यूज चॅनेलशी बोलताना गॅंगरेपबाबत हे व्यक्तव्य केले.

Oct 9, 2015, 11:33 PM IST

अल्पवयीन मुलीवर शाळेतच शिक्षकाकडून अत्याचार

देशातील आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळुरु शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसरीतील एका सहा वर्षीय विद्यार्थींनीवर शाळेतील एका पीटीच्या शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 7, 2015, 03:36 PM IST

भारतात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता

दहशतवादी संघटनांची नजर आता भारताकडे वळल्याचं दिसत आहे. आत्मघाती हल्ले होण्याची भिती आहे. गृहखात्याकडून दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

Oct 16, 2014, 04:52 PM IST

धडकत्या एका 'ह्दया'साठी चक्क थांबलीत दोन शहरे

एक 'ह्दय' पोहोविण्यासाठी देशातील दोन शहरे सहा तास थांबली. बंगळुरु शहरात रुग्ण महिलेचे निधन  झाले. तिने आपले ह्दय आधीच दान केले होते. त्याचवेळी चेन्नईतील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचे ह्दय बदलण्याची तत्काळ गरज होती. त्यामुळे धडकते हृदय सहा तासात बंगळुरुहून चेन्नईला पोहोचण्याची आवश्यकता होती. 

Sep 4, 2014, 11:56 AM IST

एटीएममधून पैसे काढताना महिलेला लुटून प्राणघातक हल्ला

बॅंकेमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांचा वेळ वाचवणारी एटीएम सुद्धा आता सुरक्षित राहिलेली नाहीत असंच म्हणावं लागेल. बंगळुरुमध्ये एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या एका महिलेवर प्राणघातक हल्ला करुन तिला लुटण्यात आलं.

Nov 20, 2013, 09:17 AM IST

सचिन-सेहवागनंतर... रोहीतची डबल सेन्चुरी!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे श्रृंखलेच्या सातव्या मॅचमध्ये रोहीत शर्माची तुफानी खेळी क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. शनिवारी, खेळताना सिक्स आणि फोरची बरसात करत रोहितनं डबल सेन्चुरी ठोकलीय.

Nov 2, 2013, 06:10 PM IST

आफरीनची मृत्‍यूपुढे शरणागती

तिची एकच चूक. मुलीचा जन्म घेतल्याची. आपल्या पोटी मुलगी जन्मला आल्याने राक्षसी बाप जागा झाला. या बापाने मानवतेचा जराही विचार न करता तीन महिन्याच्या आफरीनचा छळ करून तिचे भिंतीवर डोके आपटले आणि तेथून तिच्या जगण्याची आशा मावळली. तीन दिवस रूग्णालयात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या आफरीनने जगाचा आज बुधवारी निरोप घेतला.

Apr 11, 2012, 01:54 PM IST