बंगळुरुचा कोलकातावर ९ विकेट्सने दणदणीत विजय

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सवर बंगळुरुने ९ गड्यांनी विराट विजय मिळवला. बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. केकेआरने बंगळुरुसमोर १८४ धावांचे आव्हान ठेवले होते. 

Updated: May 16, 2016, 11:46 PM IST
बंगळुरुचा कोलकातावर ९ विकेट्सने दणदणीत विजय title=

कोलकाता : विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सवर बंगळुरुने ९ गड्यांनी विराट विजय मिळवला. बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. केकेआरने बंगळुरुसमोर १८४ धावांचे आव्हान ठेवले होते. 

कर्णधार विराट कोहलीने ५१ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या. गेलने देखील आज आरसीबीला चांगली सुरुवात मिळवून दिली. तर डिविलियर्सने ३१ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. कोलकाताकडून कर्णधार गौतम गंभारने ३४ चेंडूत ५१ धावा तर मनिष पांडे याने ३५ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५० धावा झळकावल्या. गेल, कोहली आणि डिविलियर्सच्या चांगल्या खेळाच्या जोरावर बंगळुरुने ९ विकेट्सने विजय मिळवला.