धावत्या खासगी बसमध्ये नर्सवर बलात्कार

दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणाची पुनरावृत्ती होस्कोट येथे घडली. धावत्या खासगी बसमध्ये नर्सवर बलात्कार करण्यात आला. बंगळुरुपासून ४० किलोमीटर अंतरावर होस्कोट येथे ही धक्कादायक घटना घडली. बलात्काराप्रकरणी दोघांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.

Updated: Nov 6, 2015, 06:18 PM IST
धावत्या खासगी बसमध्ये नर्सवर बलात्कार  title=

बंगळुरु : दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणाची पुनरावृत्ती होस्कोट येथे घडली. धावत्या खासगी बसमध्ये नर्सवर बलात्कार करण्यात आला. बंगळुरुपासून ४० किलोमीटर अंतरावर होस्कोट येथे ही धक्कादायक घटना घडली. बलात्काराप्रकरणी दोघांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.

मिनी बसमधून प्रवासी उतरल्यानंतर एकटीच १९ वर्षीय नर्स बसमध्ये राहिली होती. ती एकटीच असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आले. त्याने बसचा ताबा दुसऱ्याच्या हाती दिला. त्यानंतर बस चालकांना नर्सला बासनेची शिकार बनविले. बलात्कारानंतर पीडित तरुणीला काही अंतरावर सोडून दिले.

त्याच अवस्थेत पीडित तरुणी रुग्णालयात गेली. तिथे सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी बस चालक रवी आणि त्याचा साथीदार मंजुनाथ या दोघांना अटक केली. त्यांच्यावर ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

१९ वर्षीय नर्स रात्रपाळीच्या ड्युटीसाठी निघाली होती. होस्कोट येथे नर्सिंग होममध्ये ती कामाला आहे. रात्री दुसरी गाडी न मिळाल्याने तिने नेहमी याच मार्गावरुन जाणाऱ्या मिनी बसचा आसरा घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.