नवी दिल्ली : दहशतवादी संघटनांची नजर आता भारताकडे वळल्याचं दिसत आहे. आत्मघाती हल्ले होण्याची भिती आहे. गृहखात्याकडून दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.
काश्मीरमध्ये ईद दरम्यान इसिस या दहशतवादी संघटनेचाही झेंडाही दिसून आला आहे. नेमकी काय आहे स्थिती आणि नेमके काय आहेत दहशतवादी संघटनेंचे मनसुबे? अल-कायदा, इंडियन मुजाहिद्दीन, लश्कर आणि आयएसआयएस दहशतवादी यांच्यामध्ये संघटन वाढविण्यावर भर दिसत आहे.
दहशतवादी अल-कायदा या अतिरेकी संघटनेच्या माध्यमातून हल्ले करु शकतात. अल-कायदाचे अतिरेकी पर्यटन ठिकाणांना लक्ष्य करु शकतात. भारतात आत्मघातील हल्ले करण्याची तयारी अल-कायदा या संघटनेने केली आहे. यासाठी इंडियन मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मद, लश्कर ए तैयबा, आयएसआयएस आदी अतिरेकी संघटना एकत्र येऊन एकाचवेळी काही शहरांवर हल्ले करु शकतात.
अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या रडारवर प्रथम गोवा, बंगळुरु आणि अमृतसर आहेत. या ठिकाणांची अतिरेक्यांनी रेकी केली आहे. असा हल्ला होणे हे शक्य आहे. कारण भारतात अनेक शहरांवर हल्ले करण्याची तयारी आधिपासून करण्यात आल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाने दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.