बंगळुरु : एक 'ह्दय' पोहोविण्यासाठी देशातील दोन शहरे सहा तासांच्या ग्रीन कॉरीडोरसाठी चक्क थांबलीत. बंगळुरु शहरात रुग्ण महिलेचे निधन झाले. तिने आपले ह्दय आधीच दान केले होते. त्याचवेळी चेन्नईतील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचे ह्दय बदलण्याची तात्काळ गरज होती. त्यामुळे धडकते हृदय सहा तासात बंगळुरुहून चेन्नईला पोहोचण्याची आवश्यकता होती.
सहा तासात धडकते हृदय शरीराच्या बाहेर राहू शकते. त्याआधी हे हृद्य शरीरात बसविणे आवश्यक असते. त्यामुळे हातात केवळ सहा तास होते. त्यासाठी जबरदस्त नियोजनाची गरज होती. मात्र, हे नियोजन हुशार पोलिसांमुळे शक्य झाले. बंगळुरु आणि चेन्नईतील पोलिसांच्या अजब तालमेल यामुळे हे शक्य झाले.
हृद्य बदलण्यासाठी फोर्टीज रुग्णालायने यासाठी पोलिसांची मदत घेण्याचे ठरविले. तात्काळ पोलिसांनी ग्रीन कॉरीडोर योजना आखली. त्यानुसार चेन्नई आणि बंगळुरु शहरात याबाबत माहिती देण्यात आली. बंगळुर येथील विमानतळावर धडकते हृदय पोहोचण्यासाठी पोलिसांनी ग्रीन कॉरीडोर प्लॅन आखला आणि हृदय असलेली पेटी विना अडथळा १२ किमीचे अंतर सात मिनिटात पार करत विमानतळावर पोहोचली. तेथून विमानाने चेन्नईला हे हृदय पोहोचले.
चेन्नई पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर तेथेही ग्रीन कॉरीडोर प्लॅन केला गेला. केवळ दीड तासाच विमानतळावरून फोर्टीज रुग्णालयात हे धडकते हृद्य पोहोचविण्यात यश आहे. त्यानंतर ते हृद्य ज्या रुग्णाला गजर होती, त्याच्या शरीरात बसविण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.