दोन लोक बलात्कार करतात तो गॅंगरेप नाही : कर्नाटकचे गृहमंत्री

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी धक्कादायक बेताल वक्तव्य केले आहे. गँगरेपसाठी दोघे नाही तर किमान ३ ते ४ लोकांची गरज असते, असे वादग्रस्त वक्तव्य के.जे. जॉर्ज यांनी केले आहे. इंग्रजी न्यूज चॅनेलशी बोलताना गॅंगरेपबाबत हे व्यक्तव्य केले.

Updated: Oct 9, 2015, 11:58 PM IST
दोन लोक बलात्कार करतात तो गॅंगरेप नाही : कर्नाटकचे गृहमंत्री title=

बंगळुरु : कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी धक्कादायक बेताल वक्तव्य केले आहे. गँगरेपसाठी दोघे नाही तर किमान ३ ते ४ लोकांची गरज असते, असे वादग्रस्त वक्तव्य के.जे. जॉर्ज यांनी केले आहे. इंग्रजी न्यूज चॅनेलशी बोलताना गॅंगरेपबाबत हे व्यक्तव्य केले.

जर दोन लोक रेप करत असतील तर त्याला गॅंगरेप कसा म्हणायचा? दोन ते तीन लोकांनी केला बलात्कार हा सामूहिक बलात्कार होय. काही दिवसांपूर्वी कॉल सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. याबाबत  गृहमंत्र्यांनी धक्कादायक विधान केलेय.

या प्रकणाबाबत कठोर कारवाई कण्याचे सोडून वादग्रस्त भूमिका व्यक्त केली. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन लोक गँगरेप कसे करु शकतात? यासाठी किमान ३ ते ४ लोक असणे गरजेचे असते.

दरम्यान, बीपीओमध्ये काम करणाऱ्या महिलेचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. एका मिनी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेय.

याआधीही उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी देखील बलात्काराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.