पूर

जम्मूतील पुरात 70 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरला पाऊस आणि पुराचा तडाखा चांगलाच बसलाय. पुरात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झालाय. तर 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस अजूनही बेपत्ताच आहे. एनडीआरएफच्या सहा टीम्स दिल्लीहून रवाना झाल्यात. पुरामुळे जम्मू-श्रीनगर हायवे ठप्प झालाय.

Sep 5, 2014, 12:53 PM IST

दरभंगा जिल्ह्यात पावसामुळे नदीचं रौद्ररुप

दरभंगा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं नदीनं रौद्ररुप घेतलंय. या पुरामध्ये अडकलेल्या एका युवकाची दृश्य आपण पाहू शकताय. हा युवक सुरुवातीला पाण्यात वाहून गेला. मात्र नंतर त्याचवेळी त्यानं प्रसांगवधान राखत झाडाला पकडलं.

Aug 17, 2014, 02:24 PM IST

कोकण-नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, पेण-खेडात पुराचे पाणी

गेल्या तीन दिवसांपासून कोकणात पावसाच जोर वाढलेला दिसत असून संततधार सुरुच आहे. खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. या पुराचे पाणी खेडशहरात घुसले आहे. तर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. येथील धरणं भरलीत.

Jul 31, 2014, 09:32 AM IST

पूर असताना पुलावरुन बाईक नेण्याचं धाडसं जीवावर

जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातल्या पानाखासच्या नाल्याला पूर आला असताना पुलावरुन बाईक नेण्याचं धाडसं युवकांच्या अंगाशी आलं. यामध्ये दोन युवक वाहून गेले. त्यापैकी एका युवकानं झाडाला पकडल्यानं तो बचावला. पण दुसरा अजूनही बेपत्ता आहे.

Jul 25, 2014, 07:05 PM IST

व्हिडिओ: पुराच्या पाण्यासोबत खेळ पडला महागात!

पुराच्या पाण्यासोबत स्टंट करणं कसं महागात पडू शकतं, याचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय.

Jul 22, 2014, 09:11 PM IST

वर्षभरापूर्वी मिळू शकते पुराची पूर्वकल्पना

पूर, होणारं नुकसान हे सर्व टाळण्यासाठी आगामी काळात आता येणाऱ्या पुराची तब्बल ११ महिने आधी पूर्वसूचना देऊ शकेल, अशी पद्धत अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. 

Jul 9, 2014, 12:41 PM IST

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पूराची परिस्थिती कायम

चंद्रपूर जिल्ह्यात पूराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पूरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Aug 3, 2013, 07:08 PM IST

विदर्भ-कोकणात पूर परिस्थिती

चंद्रपूर जिल्ह्यात पुराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पुरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय.

Aug 2, 2013, 08:57 PM IST

विदर्भात ओला दुष्काळ जाहीर होणार?

विदर्भातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार का? याकडे विदर्भावासियांचं लक्ष लागलंय.

Jul 29, 2013, 09:25 AM IST

मंत्र्यांचा ‘पूरग्रस्त’ विदर्भ दौरा!

विदर्भात पावसानं धुमाकूळ घातलाय. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ दौरा केला.

Jul 28, 2013, 11:54 AM IST

रायगडमध्ये पूर, रत्नागिरीत भीती कायम

रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.

Jul 25, 2013, 04:48 PM IST

बुलडाण्यात दोघांचा मृत्यू, चंद्रपुरात पूर

बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय.. लोणार तालुक्यातल्या गुंदा धरणावर मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात वाहून मृत्यू झालाय. तर चंद्रपुरात नद्यांना पूर आलाय. दहा दिवसांपासून कोसळतच आहे.

Jul 25, 2013, 02:21 PM IST