विदर्भात ओला दुष्काळ जाहीर होणार?

विदर्भातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार का? याकडे विदर्भावासियांचं लक्ष लागलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 29, 2013, 09:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विदर्भातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार का? याकडे विदर्भावासियांचं लक्ष लागलंय.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भातल्या अमरावती, वाशीम, चंद्रपूर, नागपूरला भेट दिली. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी सर्वोतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. शिवाय मृतांच्या नातेवाईकांसाठी अडीच लाख रुपये मदतीची घोषणाही केली.

मात्र, त्यावेळी पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात घोषणा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विदर्भात पुरामुळं यंदा मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमीवर आज विदर्भाचं लक्ष सरकारच्या घोषणेकडे लागलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.