व्हिडिओ: पुराच्या पाण्यासोबत खेळ पडला महागात!

पुराच्या पाण्यासोबत स्टंट करणं कसं महागात पडू शकतं, याचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय.

Updated: Jul 22, 2014, 09:12 PM IST
व्हिडिओ: पुराच्या पाण्यासोबत खेळ पडला महागात! title=

बैतुल, मध्य  प्रदेश: पुराच्या पाण्यासोबत स्टंट करणं कसं महागात पडू शकतं, याचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय.

मध्यप्रदेशात बैतुलमध्ये माचना नदी सध्या दुथडी भरून वाहतेय... तिथल्या एका पुलावरून नदी वाहत असताना हा बाईकस्वार नदी पार करण्याचा प्रयत्न करत होता... आपण सहज निघून जाऊ असा त्याचा समज होता... मात्र पाण्याचा प्रवाह इतका होता, की तो तरूण थेट पाण्यात फेकला गेला... पुलाला कठडा नसल्यामुळं बाईकसकट तो प्रवाहात ओढला गेला... 
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.