जम्मूतील पुरात 70 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरला पाऊस आणि पुराचा तडाखा चांगलाच बसलाय. पुरात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झालाय. तर 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस अजूनही बेपत्ताच आहे. एनडीआरएफच्या सहा टीम्स दिल्लीहून रवाना झाल्यात. पुरामुळे जम्मू-श्रीनगर हायवे ठप्प झालाय.

Updated: Sep 5, 2014, 12:54 PM IST
जम्मूतील पुरात 70 जणांचा मृत्यू title=

जम्मू : जम्मू काश्मीरला पाऊस आणि पुराचा तडाखा चांगलाच बसलाय. पुरात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झालाय. तर 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस अजूनही बेपत्ताच आहे. एनडीआरएफच्या सहा टीम्स दिल्लीहून रवाना झाल्यात. पुरामुळे जम्मू-श्रीनगर हायवे ठप्प झालाय.

पुरात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय. काश्मीरला 22 वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पुराचा सामना करावा लागतोय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह प्रथमच जम्मू आणि काश्‍मीरच्या दौऱ्यावर येणार असून ते राज्यातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतील. 

दक्षिण काश्‍मीरमधील श्रीनगर शहरात पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी पन्नास बोटी तैनात करण्यात आल्या असून, आणखी शंभर बोटी बचावपथकांना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

जम्मू-काश्‍मीरमधील पूरस्थिती बिकट झाली असून, राज्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पूरग्रस्त भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आखण्याबरोबरच त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.