मीरा बोरवणकरांनंतर आशिष शर्मांवर गदा
पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना हटवण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर दादांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आशीष शर्मांनाही लवकरच घालवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळं शर्मांचं काय होणार, या चर्चेनं जोर धरू लागला आहे.
Feb 29, 2012, 11:00 AM ISTपुण्यात पुन्हा एकदा गाडी पळवली?
भरधाव वेगानं एसटी चालवून स्थानिकांचा बळी घेणारा संतोष मानेचं कृत्य पुणेकर विसरले नसतानाच काल पुणेकरांना काही काळ अशाच घटनेची पुनरावृत्ती होते की काय ?
Feb 22, 2012, 03:10 PM ISTपुण्यात पुठ्ठ्याचा कारखाना आगीत खाक
पुण्यातल्या जुन्या बाजारात पुठ्ठ्याच्या कारखान्याला भीषण आग आगली. त्यामुळं आसपासची १५ ते २० दुकानं आणि झोपड्या भस्मसात झाल्या.
Feb 22, 2012, 01:03 PM ISTअविनाश बागवेंना पोलिसांची धक्काबुक्की
पुण्यात काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांनी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार केली आहे. कासेवाडीतल्या प्रभाग क्र.६० मध्ये हा प्रकार घडला. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आहेत.
Feb 16, 2012, 01:38 PM ISTराजला 'अग्निपथ' झेपला नाही - उद्धव
बाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे येईन, असं राज ठाकरेंनी मुंबईतील कालच्या सभेत म्हंटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. शंभर पावलं पुढे आलात तरी बाळासाहेबांचा मार्ग झेपेल का, असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना केला आहे. ते पुणे येथे बोलत होते.
Feb 14, 2012, 08:38 PM ISTउद्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला दोन वर्ष पूर्ण
पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला उद्या दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही या प्रकरणाचा तपास अर्धवट अवस्थेतच आहे. या प्रकरणातील केवळ एका आरोपीला आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. म्हणूनच बॉम्बस्फोटाच्या घटनेतून पुणेकर सावरले असले तरी दहशतीचं सावट कायम आहे.
Feb 12, 2012, 07:44 PM ISTराज ठाकरेंचा आघाडी, युतीवर हल्लाबोल
काम कसे करायचे याची झलक पाहायची असेल तर माझ्या हातात सत्ता द्या, मी नवा पर्याय दिला आहे. पुण्याच्या विकासासाठी मला सत्ता द्या, असे आवाहन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करत आघाडी, युतीवर हल्लाबोल जोरदार हल्लाबोल चढवला.
Feb 11, 2012, 11:38 PM ISTठाण्यात शिवसेनाप्रमुख, पुण्यात राज गरजणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यात रात्री जाहीर सभा होणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होतेय. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीच्या प्रचारासाठी नागपूरात सभा घेणार आहेत.
Feb 11, 2012, 10:20 PM ISTअजित पवार-पृथ्वीराज चव्हाणांचा कलगीतुरा
पुण्यात काँग्रेसचा स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनाच नाहीय. त्यामुळे त्यांनी निवडणुकीआधीच आघाडीची भाषा सुरू केलीय. पण त्याचबरोबर अर्थखातं कुणाच्याही ताब्यात असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय काहीच होत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लगवाला आहे.
Feb 10, 2012, 05:45 PM ISTपुण्यात राज ठाकरे, अजित पवार यांचा 'रोड शो'
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये रोड शो करणार असल्यामध्ये पुण्यातल्या रस्त्यांवर आज रोड शोंचा धमाका आहे.
Feb 8, 2012, 12:12 PM ISTखा. सुप्रिया सुळे अडचणीत
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळलेत. तसेच सुळे यांच्या सिंगापूरच्या नागरिकत्वाविषयी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कागदपत्रांचा शोध घेण्यासंदर्भात न्यायालयानं सिंगापूरच्या दूतावासाला विनंती पत्र पाठवलं आहे. त्यामुळे सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे.
Feb 3, 2012, 08:27 AM ISTपुण्यातले 'मालामाल' उमेदवार
पुण्यातले आमदार, खासदारच नाही तर नगरसेवक आणि जिल्हा परिषद उमेदवारांची मालमत्ताही कोटींच्या घरात आहे.
Feb 2, 2012, 09:47 PM ISTपुण्यात लष्करी विद्यार्थ्यांची पोलिसांना मारहाण
दुचाकीसाठी बंदी असलेल्या लकडी पुलावरून सुसाट वेगाने गाडी नेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी अडविले. याचा राग आल्याने लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) विद्यार्थ्यांनी टिळक चौकातील संभाजी चौकीतील महिला पोलिसासह इतर दहा पोलिसांना मारहाण केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Feb 1, 2012, 10:54 AM ISTतर महायुती तोडू – आरपीआय
पुण्यात आरपीआयनं महायुती तोडण्याचा इशारा दिलाय. भाजपच्या आडमुठेपणामुळे युती तुटू शकते, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिलाय.
Jan 29, 2012, 11:18 PM ISTपुण्यात माथेफिरूनं ७ जणांना चिरडलं
स्वारगेट बस टेपोतून एका माथेफिरूने एसटी पळविली. तो एवढ्यावर न थांबता त्याने १० तो १२ जणांना चिरडले. या प्रकारामुळे पुणे शहर हादरले आहे. निलायम सिनेमाजवळ पोलिसांनी एसटी अडवली. मात्र, त्यापूर्वी त्यांने एसटीने २२ जणांना उडविले.
Jan 25, 2012, 02:52 PM IST