खा. सुप्रिया सुळे अडचणीत
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळलेत. तसेच सुळे यांच्या सिंगापूरच्या नागरिकत्वाविषयी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कागदपत्रांचा शोध घेण्यासंदर्भात न्यायालयानं सिंगापूरच्या दूतावासाला विनंती पत्र पाठवलं आहे. त्यामुळे सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे.
Feb 3, 2012, 08:27 AM ISTपुण्यातले 'मालामाल' उमेदवार
पुण्यातले आमदार, खासदारच नाही तर नगरसेवक आणि जिल्हा परिषद उमेदवारांची मालमत्ताही कोटींच्या घरात आहे.
Feb 2, 2012, 09:47 PM ISTपुण्यात लष्करी विद्यार्थ्यांची पोलिसांना मारहाण
दुचाकीसाठी बंदी असलेल्या लकडी पुलावरून सुसाट वेगाने गाडी नेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी अडविले. याचा राग आल्याने लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) विद्यार्थ्यांनी टिळक चौकातील संभाजी चौकीतील महिला पोलिसासह इतर दहा पोलिसांना मारहाण केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Feb 1, 2012, 10:54 AM ISTतर महायुती तोडू – आरपीआय
पुण्यात आरपीआयनं महायुती तोडण्याचा इशारा दिलाय. भाजपच्या आडमुठेपणामुळे युती तुटू शकते, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिलाय.
Jan 29, 2012, 11:18 PM ISTपुण्यात माथेफिरूनं ७ जणांना चिरडलं
स्वारगेट बस टेपोतून एका माथेफिरूने एसटी पळविली. तो एवढ्यावर न थांबता त्याने १० तो १२ जणांना चिरडले. या प्रकारामुळे पुणे शहर हादरले आहे. निलायम सिनेमाजवळ पोलिसांनी एसटी अडवली. मात्र, त्यापूर्वी त्यांने एसटीने २२ जणांना उडविले.
Jan 25, 2012, 02:52 PM ISTनिवडणुकीसाठी 'जोडी तुझी-माझी' !
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या प्रेरणेतून झाल्याचा गवगवा राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच करते. पण त्यांच्याच पक्षातले स्थानिक नेते या निर्णयाचा उपयोग करत मनपा निवडणुकांचं तिकीट घरातच रहावं यासाठी कसे प्रयत्नशील आहेत.
Jan 22, 2012, 09:07 AM ISTनिवडणूक कर्मचा-यांना मारहाण
पुण्यात आचारसंहिताभंग करुन राजकीय नेते थांबलेले नाहीत, तर निवडणूक कर्मचा-यांना मारहाणीपर्यंत त्यांची मजल गेलीय. निवडणूक कर्मचा-यांना मारहाण आणि कॅमेरा फोडण्याचा प्रकार पुण्यात घडलाय. काँग्रेसचे उमेदवार चंद्रशेखर घाटे यांनी ही प्रताप केलाय.
Jan 21, 2012, 07:31 AM ISTनिवडणुकीची धामधुम, काँग्रेस भवनात मात्र सामसुम
महापालिका निवडणुकीच्या मतदानाला एक महिन्यांहून कमी कालावधी उरला आहे. निवडणूक अशी तोंडावर आली असताना असताना काँग्रेस भवनात सध्या शुकशुकाट पहायला मिळत आहे.
Jan 19, 2012, 08:31 AM ISTपुण्याच्या चौकांत प्रचाराला बंदी
पुण्यात यंदा भर रस्त्यांत आणि चौकाचौकांमध्ये प्रचाराचा फड रंगणार नाही. प्रचारासाठी महापालिकेनं फक्त २५५ मैदानंच निश्चित करुन दिलीयत. त्यातून महापालिका उत्पन्नही मिळवणार आहे.
Jan 13, 2012, 08:35 PM ISTभारत बनविणार महासुपर संगणक
संगणक क्षेत्रात भारताचे दमदार पाऊल पडले आहे. आता तर सुपर कम्प्युटरच्या कैक पटीने मजल मारणारा महासुपर संगणक ('एक्झाफ्लॉप' ) तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातील माहिती-तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा बदलू शकणार आहे.
Jan 7, 2012, 01:34 PM ISTआचारसंहिता भंग : अजित पवार अडचणीत
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजित पवार यांच्याकडे राज्य निवडणूक आयोगाने खुलासा मागितला आहे. पुण्यात विकासकामांच्या भूमिपूजनचा कार्यक्रम केला होता.
Jan 6, 2012, 01:43 PM ISTपुण्यात राष्ट्रवादीचा एकलो चलोचा नारा
www.24taas.com - पुण्यात काँग्रेस बरोबर आघाडीची शक्यता नसल्याचं स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत. पिंपरी-चिंचवडनंतर पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
Jan 4, 2012, 02:32 PM ISTबलात्कारी मोहनीराजला होणार का शिक्षा?
२००९ मध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणात पुण्यातील मोहनीराज कुलकर्णी या ८१ वर्षाच्या आरोपीला पूणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवल आहे. मोहनीराजला या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jan 3, 2012, 07:01 PM ISTनिम्हणांच्या समर्थकांची ‘गिरीं’वर दादागिरी
पुण्यात आमदार विनायक निम्हणांची आंदोलक अधिका-यांविरोधात दादागिरी सुरू आहे. आधी तहसीलदारास धमकी देणाऱ्या निम्हणांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली आहे. आमदार विनायक निम्हण यांच्यावर पुण्यातील तहसिलदार सचिन गिरी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
Jan 2, 2012, 08:54 PM ISTराजगुरुनगरमध्ये भर दिवसा हत्या
पुण्यातल्या राजगुरुनगरचे उपसरपंच सचिन भंडलकर यांची हत्या करण्यात आलीय. अज्ञात इसमांनी त्यांच्यावर तलवारीनं वार केले. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 1, 2012, 02:13 PM IST