www.24taas.com, मुंबई
प्रचाराला शेवटचे दोन तीन दिवस राहील्यानं सर्वच पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करतायत. त्यातच आज रविवारची सुट्टी साधून प्रचाराला धडाका नेत्यांनी लावलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यात रात्री जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होतेय. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीच्या प्रचारासाठी नागपूरात सभा घेणारेत. नागपूरात आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होतोय. तर मुंबई महापालिकेत कुणालाही बहुमत मिळणार नाही असा अंदाज पोलीस गुप्तचरांनी वर्तवलाय. त्यामुळं एकहाती सत्ता मिळवणं कुठल्याच आघाडीला शक्य नसल्याचं स्पष्ट झालय.
नाशिकमध्ये दोन्ही काँग्रेसची आघाडी असली तरी प्रचारात संघर्ष उडतायत. प्रभाग क्र १७ मध्ये काँग्रेसचे दिनकर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव माळी हे दोघे नगरसेवक रिंगणात आहेत. दोन्ही पक्षांनी ही लढत प्रतिष्ठेची केल्यानं आघाडीचे कार्यकर्ते हातघाईवर आले होते.
[jwplayer mediaid="45736"]