पुणे

पुण्याच्या मेट्रो रेल्वेचे वाजले की बारा...

पुण्यातील मेट्रो प्रकल्प मार्च 2012 पर्यंत लांबणीवर पडला. महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिल्यानं मेट्रोच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळं आता निवडणुकांनंतर मार्चमध्ये नव्या सभागृहातच मट्रोचा विषय चर्चेला येणार आहे.

Nov 23, 2011, 03:47 PM IST

मुंबईत आघाडी, पुणे- पिंपरीत बिघाडी

दोन्ही काँग्रेसमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बिघाडीच होण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि ठाण्यासह इतर ठिकाणी आघाडी करण्यास राष्ट्रवादी इच्छुक असल्याचं दिसतंय.

Nov 22, 2011, 10:18 AM IST

परप्रांतियांना सत्ताधारी गोंजारत आहेत - राज

कापूस उत्पादक शेतकरी तडफडतो आहे. परप्रांतियांना तुम्ही गोंजारता. मराठी माणूस प्रश्नांसाठी रस्त्यावर आला की काठय़ा मारता, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथे केली.

Nov 21, 2011, 03:05 AM IST

नवलेंची सिंहगड इन्स्टिट्युट सील

मारुती नवलेंनी महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या नोटीशींना केराची टोपली दाखवल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.

Nov 17, 2011, 07:43 AM IST

साला मै साब बन गया!!!

रिक्षाप्रवास म्हटला की, रिक्षावाल्याची अरेरावी आणि त्याची उद्धट उत्तरे असाच अनुभव बहुतांश ग्राहकांना येतो. मात्र पुण्यातील रिक्षावाले आता तुम्हाला अत्यंत सभ्यतेनं आणि कदाचित इंग्लिशमध्येही बोलताना दिसतील.

Nov 13, 2011, 11:32 AM IST

लवासाला पर्यावरण मंत्रालयाचा दिलासा

अखेर लवासाला पर्यावरण मंत्रालयाने सशर्त परवानगी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील १५,००० एकर जमीनिवर उभं राहत असलेला लवासा प्रकल्प पहिल्यापासूनचा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

Nov 9, 2011, 10:54 AM IST

'लवासा'ची राज्य सरकारकडून चौकशी

लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रमुख अजित गुलाबचंद यांच्यासह लवासाच्या मुख्य अधिका-यांची राज्य सरकारकडून लवकरच चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

Nov 5, 2011, 01:23 PM IST

'लवासा'विरोधात खटला दाखल होणार

लवासाने पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींचा भंग करून लवासा सिटीत बांधकाम केल्याने लवासाच्या विरोधात राज्य सरकार खटला दाखल करणार आहे.

Nov 3, 2011, 02:56 AM IST

अडवाणींची रथयात्रा पुण्यात, गटबाजीचे प्रदर्शन

अडवाणींची रथयात्रा आज पुण्यात येतेय. मात्र, यानिमित्तानं पुणे भाजपातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे

Nov 3, 2011, 02:39 AM IST

पेट्रोल भडक्याने पुण्यात रिक्षा भाडेवाड

पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना रिक्षा भाडेवाढीचा ‘चटका' बसणार आहे. या दरवाढीमुळे रिक्षासाठी नागरिकांना आता पहिल्या किलोमीटरसाठी पूर्वीप्रमाणे ११, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी नऊऐवजी दहा रुपये मोजावे लागणार आहेत.

Nov 2, 2011, 02:24 AM IST

पुण्यात पाण्याचा ‘लोड’ कमी

लोडशेडिंगचा परिणाम पुण्यात पाणीपुरवठ्यावर झाला आहे. आज कमी दाबानं पाणीपुरवठा केला गेला. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लोडशेडिंगचा फटका पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला बसल्याने पाणी कमी दाबानं सोडावे लागलं आहे.

Oct 12, 2011, 08:24 AM IST

मनसेचा महाआरतीद्वारे पोलिस कारवाईचा निषेध

पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांवर केलेल्या या कारवाईच्या विरोधात राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती करुन पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.

Oct 2, 2011, 01:04 PM IST