पुणेकरांना राष्ट्रवादीने टोपी घातली

पेट्रोलवरची जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याचं आश्वासन पुण्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र , निवडणूक झाल्यावर राजकीय पक्षांना या आश्वासनाचा विसर पडलाय. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं पेट्रोलवरची जकात 1 टक्का कमी करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे.

Updated: Apr 25, 2012, 03:40 PM IST

 www.24taas.com, पुणे

 

 

पेट्रोलवरची जकात  दोन  टक्क्यांवरून  एक  टक्का  करण्याचं  आश्वासन  पुण्यातल्या  राजकीय  पक्षांनी  निवडणुकीपूर्वी  दिलं  होतं. मात्र , निवडणूक  झाल्यावर राजकीय  पक्षांना  या  आश्वासनाचा विसर पडलाय. महापालिकेच्या सर्वसाधारण  सभेनं पेट्रोलवरची जकात 1 टक्का  कमी  करण्याचा  प्रस्ताव  रद्द  केला आहे. पुणे पालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे.

 

 

पेट्रोलच्या  गगनाला  भिडलेल्या  दारातून  पुणेकरांना  दिलासा  देण्यासाठी  पेट्रोल वरची जकात दोन  वरुन  एक  टक्का  करण्याचा  प्रस्ताव  ठेवण्यात  आला. 28 जून  2011 रोजी स्थायी समितीनं एकमतानं हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर तब्बल ८ महिन्यांनंतर २१ फेब्रुवारीला हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आला. त्यावेळी हा  विषय  मार्च  महिन्यापर्यंत  तहकूब  करण्यात  आला. दरम्यानच्या  काळात  महापालिकेच्या  निवडणुका  झाल्या . निवडणुकीनंतर  सोमवारी पुन्हा  हा  प्रस्ताव  सर्वसाधारण  सभे  पुढे  आला . आणि  यावेळी  तो  कायमचा  गुंडाळून   ठेवण्यत  आला .

 

 

पेट्रोलवरची जकात  कमी  करण्याचा  प्रस्ताव  रद्द  झाल्यानं  पेट्रोल  एक  रुपयानं  स्वस्त  होण्याच्या  पुणेकरांच्या  आशेवर  पाणी  पडलंय़. राजकीय  पक्षांनी  मात्र यासाठी  पेट्रोल  डिलर  असोसिएशनला जबाबदार धरलंय. तर दुसरीकडे पेट्रोल  dealer  association ला मात्र हा आरोप मान्य नाही.  कारण काहीही असो, दिलेलं आश्वासन न पाळून महागाईच्या आगीत तेल ओतण्याचं काम महापालिकेनं केलंय. आता आश्वासन न पाळल्याच्या पळवाटा शोधल्या जातायत. राजकीय पक्ष्यांच्या या थापा पुढची पाच वर्ष पाहत राहण्याशिवाय पुणेकरांसमोर पर्याय नाही.