चक्क एसटी चालकाला लष्करी जवानांनी उचलून नेले, प्रवाशी वाऱ्यावर

बस चालकानं अपघात टाळत समोरच्या कारला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि गाडी थांबवली. त्याच वेळी मागून येणा-या एका लष्कराचा ट्रक बसला येऊन धडकला. या ट्रकमधील जवानांना राग आला आणि त्यांनी चक्क बस ड्रायव्हरला उचलून ट्रकमध्ये टाकलं आणि घेवून गेले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 9, 2013, 11:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
तुम्ही पुण्याहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून मुंबईला निघालाय. तुमचा प्रवास सुरु झाला आणि मधेच तुमच्या गाडीला थांबवलं जात, तुमच्या गाडीच्या चालकाला उचलून दुस-या गाडीत टाकून घेऊन गेलं जातं. असं जर तुमच्या बरोबर घडलं तर तुमची अवस्था काय होईल? अशीच घटना पुण्याहून मुंबईला निघालेल्या ३२ प्रवाशांची झाली. नेमकं काय घडलं त्याच्या हा रिपोर्ट.

हे प्रवासी आहेत पुणे दादर बसचे. एका बसमधून दुस-या बसमध्ये चढणारे प्रवासी पाहिल्यावर तुम्हाला बसचा काही प्रॉब्लेम झाल्यासारखं वाटेल. पण तसं नाही, एका बस मधून उतरून दुस-या बसमध्ये जाण्याची या प्रवाशांवर वेळ का आली हे ऐकूण तुम्ही आश्चर्य चकीत व्हाल. दुपारी दीड ला MH 06 -S- 8224 ही बस पुणे स्टेशन वरून दादरला निघाली. पण पिंपरी मध्ये महापालिका भावना जवळ या बस चालकानं अपघात टाळत समोरच्या कारला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि गाडी थांबवली. त्याच वेळी मागून येणा-या एका लष्कराचा ट्रक बसला येऊन धडकला. या ट्रकमधील जवानांना राग आला आणि त्यांनी चक्क बस ड्रायव्हरला उचलून ट्रकमध्ये टाकलं आणि घेवून गेले.
अखेर घटना स्थळावर पोलीस पोहचले. त्यांनी प्रवाशांसाठी दुसरी बस मागवून घेतली. दरम्यान अंदाज लावून जवान हे देहू लष्कराच्या देहूरोड मुख्यालयाचे असतील हे समजून तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. त्या नंतर तब्बल ४५ मिनिटांनी बस चालक परत आला आणि सर्वांनी एकच सुस्कारा सोडला. चालक परत आल्यानं सगळ्यांनीच सुस्कारा सोडला खरा. पण दुपारी पालिका चौकात घडलेल्या या नाट्यामुळ बरेच जण चकित झाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ