पुणे

नाशिकनंतर राज ठाकरेंचा मोर्चा पुण्याकडे....

मनसेच्या नाशिकमधील नगरसेवकांची मुंबईत झाडाझडती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये येणार आहेत.

Jan 22, 2014, 09:34 AM IST

नरेंद्र दाभोलकर हत्या : दोघांना अटक, आरोपी आज कोर्टात

सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या संदर्भात मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांनाही पुण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोघेही नागोरी गँगचे सदस्य आहेत.

Jan 21, 2014, 11:46 AM IST

कोरेगाव पार्कमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड झालंय. कोरेगाव पार्कमधल्या मीरा नगर सोसायटीमध्ये छापा घालून सहा तरुणींची पोलिसांनी सुटका केली.

Jan 15, 2014, 09:35 PM IST

पालिकेच्या शाळेत सव्वा चार कोटींची लोखंडी बाकं?

पुणे महापालिकेचं शिक्षण मंडळ म्हणजे गैरव्यवहार… असंच जणू समीकरण झालंय. शिक्षण मंडळाचा आणखी एक प्रताप पुढे आलाय.

Jan 14, 2014, 11:26 PM IST

‘अॅन्ड्रॉईड’करांसाठी `निर्भया : बी फिअरलेस` अॅप!

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुण्यात सुरु करण्यात आलेल्या `निर्भया : बी फिअरलेस` या अॅपला मोठा प्रतिसाद मिळाला.

Jan 14, 2014, 08:35 PM IST

खंबाटकी घाटातील अपघातात ९ ठार, ५ जखमी

बंगलोर हायवेवर साताऱ्याकडून पुण्याकडे जात असलेल्या टेम्पो क्रुझरला अपघात झाला. खंबाटकी घाटात झालेल्या या अपघातात ९ ठार तर ५ जण गंभीर जखमी झालेत.

Jan 14, 2014, 08:21 AM IST

दाजीकाका गाडगीळ यांचे पुण्यात निधन

पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या पुण्यातल्या सराफी पेढीचे आधारस्तंभ, शंभरीतही तरुणाईला लाजवणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचे शुक्रवारी पुण्यात प्रयाग रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 99 वर्षाचे होते.

Jan 10, 2014, 03:02 PM IST

आम आदमीला राज्यात परिवर्तनाची स्वप्नं

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने यश मिळवल्यानंतर आता राज्यातही आम आदमी पार्टीच्या नेत्यांना परिवर्तनाची स्वप्नं पडू लागलीयत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ लोकसभा मतदार संघात मारुती भापकर किंवा उल्का महाजन या निवडणूक लढवतील, अशी घोषणाच स्थानिक पातळीवर करण्यात आलीय.

Jan 7, 2014, 06:44 PM IST

दहा लाखासाठी चिमुरड्याचं अपहरण, पण...

पुण्यातील मुंढवा येथे पाच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा कट मोठ्या बहिणीच्या आणि आजुबाजुला उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला.

Jan 7, 2014, 04:22 PM IST

पुण्यात कर्नलचे ऑनलाईन बँकिंग वापरून ५ लाख लांबवले

पुण्यात इंटरनेट बँकिंग द्वारे कर्नलची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कर्नल संजीव शेअर यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Jan 6, 2014, 10:55 AM IST

साहित्य संमेलन: उद्घाटनातली चूक समारोपात सुधारली

८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सासवडमध्ये पार पाडला. उद्धघाटनाच्या कार्यक्रमात झालेली चूक समारोपाच्या कार्यक्रमात आयोजकांनी सुधारली.

Jan 5, 2014, 10:52 PM IST

कऱ्हाकाठची साहित्य चळवळ

पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. त्याच कऱ्हेच्या काठावरून...

Jan 4, 2014, 08:00 AM IST

मराठी साहित्य संमेलन, नव्या वादाची ठिणगी

सासवड साहित्य संमेलनाचं उद्घाटन अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले असताना, एका नव्या वादाला तोंड फुटलंय. तीन कवीना चक्का निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. हा राग आहे की नाराजी व्यक्त करण्याची पद्धत आहे, अशी चर्चा आहे.

Jan 3, 2014, 02:58 PM IST

८७व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

सासवड नगरी. ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात होतेय. सासवडच्या क-हा नदीकाठी साहित्याच्या मेळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार आहे.
८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सासवड सज्ज होतंय. यानिमित्तान सासवडचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे.

Jan 3, 2014, 08:40 AM IST

काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडे तब्बल सरकारी योजनेतील अकरा सदनिका

काँग्रेसचे माजी राज्यमंत्री चंद्रकांत शिवरकर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप होतोय. पुण्यातील एका आर्थिक मागास योजना प्रकल्पात त्यांच्या नावे एक नाही, दोन नाही तर तब्बल अकरा सदनिका असल्याचे समोर आलंय. या सदनिकांचा उल्लेख त्यांच्या पत्नी नगरसेविका कविता शिवरकर यांच्या निवडणूक शपथपत्रात देखील आहे.

Jan 2, 2014, 09:19 AM IST